Join us

ग्रीन टी की सायडर व्हिनेगर, वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:35 IST

Apple Cider Vinegar vs Green Tea: अनेकदा लोक या गोष्टीबाबत कन्फ्यूज असतात की, वजन कमी करण्यासाठी कोणतं ड्रिंक जास्त चांगलं ठरतं?

Apple Cider Vinegar vs Green Tea: चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच शरीराची हालचाल कमी किंवा एक्सरसाईज न केल्यामुळं जास्तीत जास्त लोक आजकाल लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. एकदा जर वजन वाढलं ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि भरपूर वेळही द्यावा लागतो.

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. ज्यातील एक उपाय म्हणजे डिटॉक्स ड्रिंक. यात सगळ्यात वर ग्रीन टी आणि अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचं नाव घेतलं जातं. दोन्ही ड्रिंक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण अनेकदा लोक या गोष्टीबाबत कन्फ्यूज असतात की, वजन कमी करण्यासाठी कोणतं ड्रिंक जास्त चांगलं ठरतं? अशात या दोनपैकी कोणतं ड्रिंक जास्त फायदेशीर ठरतं, तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ग्रीन टी चे फायदे

ग्रीन टी मध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, कॅफीन, व्हिटॅमिन्स आणि एल-थीनाइनसारखे पोषक तत्व असतात. ग्रीन टी पिऊन शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे कॅलरी वेगानं बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. ग्रीन टी पिऊन वजन कमी करण्यासोबतच चेहराही ग्लोईंग होतो. इतकंच नाही तर ग्रीन टी नियमितपणे पिऊन स्ट्रेसही कमी होतो.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे फायदे

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिऊन पचन तंत्र मजबूत होतं. त्याशिवाय मेटाबॉलिज्म रेटही बूस्ट होतो. अशात वजन वेगानं कमी करण्यास मदत मिळते. तसेच हे व्हिनेगर पिऊन शरीरातील वेगवेगळ्या क्रियाही अधिक चांगल्या पद्धतीनं होताता. ज्या लोकांना हाडांसंबंधी समस्या असतात त्यांना अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिण्याचा सल्ला दिला जातो.

वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

मुळात दोन्ही ड्रिंक्सचे आपापले फायदे आहेत. दोन्हींमध्ये वजन कमी करण्यासाठी आवश्यक तत्व आहेत. सोबतच या ड्रिंक्सनं आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार यापैकी कोणत्याची ड्रिंकची निवड करू शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स