Weight Loss : वजन कमी करण्याची प्रक्रिया फारच कंटाळवाणी आणि जास्त वेळ घेणारी असते. त्यामुळे लोक सतत शिस्तीत राहू शकत नाहीत. या प्रक्रियेत जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाता येत नाही. पण ही प्रक्रिया कंटाळवाणी होऊ न देता, काही असे पदार्थ खावेत ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळेल आणि तुम्हाला कंटाळाही येणार नाही.
आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यांद्वारे तुम्ही तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास जरा इंटरेस्टींग करू शकता. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत नेहमीच पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत. एकावेळी कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि जे काही खाल ते थोड्या थोड्या वेळानं विभागून खावं. जेणेकरून भूक लागणार नाही. यालाच पोर्शन ईटिंग असं म्हणतात.
शुगर फ्री योगर्ट
जर तुम्ही योगर्ट खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बाब आहे. आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर योगर्ट मिळतात. ज्यातील इंग्रेडिएंट्स तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की, वजन कमी करण्यासाठी शुगर फ्री योगर्टची निवड करा. तुम्ही हे दही ग्रेनोला किंवा नट्स, बेरीज इत्यादीसोबत खाऊ शकता.
पॉपकॉर्न किंवा क्रॅकर्स
पॉपकॉर्नला सुद्धा वजन कमी करण्यासाठी एक आदर्श स्नॅक मानलं जातं. पण हेही तुम्ही कमी प्रमाणातच खावेत. तुम्ही फक्त पॉपकॉर्न खाण्याऐवजी त्यासोबत काही प्रोटीन असलेल्या गोष्टीही खाव्यात. जेणेकरून पोट भरावं. हेही लक्षात ठेवा की, शरीराला केवळ स्नॅक्सची सवय पडू नये. जर तुम्ही काही चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर हे स्नॅक्स चांगला पर्याय आहे.
थीन स्लाइस चीज
जर तुम्हाला चीज खायला आवडत असेल तर फुल फॅट चीज खावं. जेणेकरून यातून तुम्हाला भरपूर पौष्टिक तत्व मिळावेत. पातळ साइजच्या चीज वापर करू शकता आणि जेवणावर वरून टाकून बेक करूनही खाऊ शकता. वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठीही तुम्ही चीजचा वापर करू शकता.
थीन स्लाइस ब्रेड
ब्रेडच्या २ पातळ स्लाइसमध्येही तेवढ्याच कॅलरी असतात, जेवढ्या रेगुलर ब्रेडमध्ये असतात. तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये किंवा सायंकाळी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कमी कॅलरी मिळतील आणि पोटही भरेल. पोर्शन ईटिंगसाठी हे एक चांगला पर्याय आहे. ब्रेडची निवड करताना काळजी घ्या की, ब्रेड होल ग्रेनपासून किंवा ऑर्गेनिक ब्रेडपासून बनलेले असावेत.
ब्लेंडेड कॉटेज चीज
जर तुम्ही कॉटेज चीजला ब्लेंड केलं तर याची टेस्ट आणखी वाढते. तुम्ही हॉट सॉस आणि सीजनिंगसोबतच हे चीज खाऊ शकता. यातून तुम्हाला भरपूर पौषक तत्व मिळतील आणि जेवणाची टेस्टही वाढते. सोबतच कमी खाऊनही तुमचं पोट भरू शकतं. पोर्शन ईटिंग करताना काळजीही घेतली पाहिजे, कारण चीजमध्ये जास्त कॅलरी असतात.