Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

Flaxseeds For Weight Loss : Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them : 3 simple ways to use flaxseed for weight loss : How to eat flax seeds for weight loss : वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बियांचा समावेश डेली रुटीनमध्ये कसा करावा ते पाहूयात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 16:20 IST2025-05-21T16:05:26+5:302025-05-21T16:20:29+5:30

Flaxseeds For Weight Loss : Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them : 3 simple ways to use flaxseed for weight loss : How to eat flax seeds for weight loss : वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बियांचा समावेश डेली रुटीनमध्ये कसा करावा ते पाहूयात....

Flaxseeds For Weight Loss Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them 3 simple ways to use flaxseed for weight loss How to eat flax seeds for weight loss | अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम असा ऋतू आहे, असे मानले जाते. उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो, पाणी पिण्याची सवय वाढते आणि त्यामुळे (Flaxseeds For Weight Loss) शरीरातील अपायकारक विषारी घटक आपोआप बाहेर टाकले जातात. यासाठीच, उन्हाळ्यात वजन कमी करणे (Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them) फायदेशीर असते. वाढलेल वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज (3 simple ways to use flaxseed for weight loss) आणि डाएट सोबतच, काही सोपे आणि असरदार घरगुती उपाय देखील करतो. उन्हाळ्यात जर तुम्ही देखील वजन कमी करणार असाल तर, अळशीच्या बिया तुमच्या आहारात असणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं(How to eat flax seeds for weight loss).

अळशीच्या बियांमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे पचन सुधारतात, भूक नियंत्रणात ठेवतात आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. विशेषतः उन्हाळ्यात या बिया शरीराला थंडावा देण्याचेही काम करतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून अळशीच्या बियांकडे पाहिलं जात. जर आपण देखील उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर, एक्सरसाइज आणि डाएट सोबतच, अळशीच्या बियांचा समावेश डेली रुटीनमध्ये कसा करावा ते पाहूयात. 

वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया... 

१. अळशीच्या बिया थेट खाणे थोडे कठीण आहे कारण त्या पचायला बराच वेळ लागतो. यासाठी, अळशीच्या बिया सर्वात आधी हलक्या भाजून घ्या. त्यानंतर या बिया मिक्सरमध्ये वाटून बारीक करा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. या अळशीच्या ड्रिंकची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालू शकता. हे चयापचय क्रियेचा वेग गतिमान करते आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. दररोज अळशीची पावडर अशा प्रकारे घेतल्यास पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते.

कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...

२. जर तुम्हाला वेटलॉस करताना चविष्ट आणि पोटभर नाश्ता हवा असेल तर दह्यात अळशीच्या बियांची पावडर घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. एक वाटी ताज्या दह्यात एक चमचा अळशीची पावडर मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात सफरचंद, केळी किंवा तुमच्या आवडीप्रमाणे चिरलेली फळे देखील घालू शकता. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे दिवसभर तुमचे पोट भरलेले राहते, यामुळे दिवसभरात जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

मुखवासातील 'हा' खास पदार्थ करतो सरसर वजन कमी! पोटाची ढेरी -बेढब मांड्या होतील सुडौल...

३. एक ग्लासात पाणी घेऊन त्यात अळशीच्या बिया घालून रात्रभर पाण्यांत भिजत ठेवाव्यात. सकाळी हे पाणी गाळून हलकेच गरम करून प्यावे. अळशीचे हे पाणी आपले शरीर आतून डिटॉक्स करण्यास मदत करते. इतकेच नाही तर मेटाबॉलिजमचा वेग वाढवण्यास देखील मदत करते. यामुळे आपल्या शरीरातील फॅट्स अगदी झटपट कमी होतात, परिणामी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

जपानी लोक या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

मासिक पाळीत पोट खूप जास्त दुखते ? करा १ सोपं आसन - पोटदुखी थांबून मिळेल आराम...

४. अळशी फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही, तर ती पचनसंस्था मजबूत करण्यासही मदत करते. आपल्या रोजच्या आहारात अळशीचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. अळशीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. महिलांसाठी अळशी विशेषतः फायदेशीर आहे, कारण ती हार्मोनल संतुलन साधण्यास मदत करते. याशिवाय, अळशी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त ठरते. म्हणजेच, हे छोटंसं बी अनेक मोठ्या आरोग्य समस्यांवर फायदेशीर ठरू शकतं.

Web Title: Flaxseeds For Weight Loss Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them 3 simple ways to use flaxseed for weight loss How to eat flax seeds for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.