Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन झटपट कमी करण्याचे ७ नियम, २८ दिवसांत होता येतं फॅट टू फिट

वजन झटपट कमी करण्याचे ७ नियम, २८ दिवसांत होता येतं फॅट टू फिट

Weight Loss Tips : फिटनेस कोच Lessie यानी असेच ७ नियम सांगितले आहेत. जे तुम्ही फॉलो केले तर २८ दिवसात तुम्ही वजन कमी होऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:24 IST2025-06-24T12:26:32+5:302025-06-24T14:24:48+5:30

Weight Loss Tips : फिटनेस कोच Lessie यानी असेच ७ नियम सांगितले आहेत. जे तुम्ही फॉलो केले तर २८ दिवसात तुम्ही वजन कमी होऊ शकतं.

Fitness coach tells 7 rules to lose weight quickly in 28 days! | वजन झटपट कमी करण्याचे ७ नियम, २८ दिवसांत होता येतं फॅट टू फिट

वजन झटपट कमी करण्याचे ७ नियम, २८ दिवसांत होता येतं फॅट टू फिट

Weight Loss Tips : तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? प्रयत्न कराच पण हेही लक्षात ठेवा की, हे काही सोपं काम नाही. वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये अशी माहिती देणाऱ्या गोष्टी इंटरनेटवर ढिगानं आहेत. पण तरी सुद्धा वजन कमी होत नसेल तर यासाठी काहीना काही कारणं नक्कीच असतील. तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल आणि याबाबत तुम्ही सिरीअस असाल काही नियम नक्कीच पाळले पाहिजेत. फिटनेस कोच Lessie यानी असेच ७ नियम सांगितले आहेत. जे तुम्ही फॉलो केले तर २८ दिवसात तुम्ही वजन कमी होऊ शकतं.

सोडा

वजन कमी करण्याचं सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे सोडा पिणं बंद करा. सोड्यामधील शुगर वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडथळा ठरते. यानं तुमचं वजन वाढतं आणि मेटाबॉलिक समस्याही होतात. डाएट सोडामध्ये कॅलरी नसतात असं सांगितलं जातं. पण यानं भूक वाढते आणि ब्लोटिंगची समस्या होते. सोड्याऐवजी तुम्ही पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकता.

शुगर

शुगर असलेल्या गोष्टी खाल्ल्यानं किंवा प्यायल्यानं तुमचं कॅलरी इनटेक वाढतं. इतकंच नाही तर ब्लड शुगर अचानक वाढू शकते. शुगरमुळे चरबी सुद्धा वाढते. त्यामुळे शुगर बंद करा. यानं तुमची चरबी कमी होईल आणि शरीरात कॅलरी सुद्धा राहणार नाहीत. 

कॉफी

बरेच लोक कॉफीनं दिवसाची सुरूवात करतात. पण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात कॉफीमधील कॅफीन अडथळा ठरतं. कॅफीनमुळे झोपेचा पॅटर्न बदलतो, तणाव वाढतो आणि वजन वाढण्यासाठी कारणीभूत कार्टिसोल हार्मोन्सही वाढतात. अशात २८ दिवसांसाठी कॉफी बंद कराल तर तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल.

१० वाजताआधी झोपा

वजन कमी करण्यात झोपेची महत्वाची भूमिका असते. रात्री १० वाजताआधी झोपाल तर यानं तुम्हाला फायदा मिळेल. रात्रीची शांत आणि गाढ झोप शरीरासाठी खूप महत्वाची असते. झोपेनं शरीरा रिचार्ज होतं आणि पुन्हा काम करण्यास तयार राहतं. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर यानं वजन वाढू शकतं.

रोज २० मिनिटं व्यायाम

फिटनेस कोच सांगतात की, रोज किमान २० मिनिटं व्यायाम केला पाहिजे. यात तुम्ही चालणं, धावणं किंवा कार्डिओचा समावेश करा. वेगानं चालल्यास तुमच्या कॅलरी अधिक बर्न होतात. ज्याचा तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होतो.

१० मिनिटं मेडिटेशन

वजन कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं असणं सुद्धा महत्वाचं असतं. चिंता, तणाव दूर करण्यासाठी रोज किमान १० मिनिटं तरी मेडिटेशन केलं पाहिजे. याचा वजन कमी करण्यासोबतच एकंदर आरोग्याला फायदा मिळेल.

२ लीटर पाणी प्या

हायड्रेशन वजन कमी करण्याचा महत्वाचा भाग आहे. पचन चांगलं होण्यासाठी असो, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी असो वा एनर्जी मिळवण्यासाठी असो पाणी खूप महत्वाचं ठरतं. यानं भूक कमी लागते, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि विषारी तत्व बाहेर पडतात. त्यामुळे रोज किमान २ लीटर तरी पाणी प्यायला हवं.
 

Web Title: Fitness coach tells 7 rules to lose weight quickly in 28 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.