वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज, डायटिंग आणि लाइफस्टाईळमध्ये बदल असे अनेक उपाय करूनही फायदा होत नसल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात. पण अनेकांना याचं नेमकं कारण माहीत नसतं. यामागे शरीरातील हार्मोन तर नाहीत ना? हार्मोन वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. हार्मोन्स मेटाबॉलिज्म, भूक आणि फॅट स्टोरेज नियंत्रित करतात.
जगभरात कोट्यावधी लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. अनेक प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अशात डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग अशा जीवघेण्या आजारांचे ते शिकार होत आहेत. प्रयत्न करूनही वजन होत नसेल तर याची कारणं तुम्ही जाणून घेतली पाहिजेत. वजन कमी न होण्याचं मुख्य कारण हार्मोन असतात. लाइफस्टाईल आणि फिटनेस कोच भाविका पटेलनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, कोणते हार्मोन्स तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा ठरतात.
इन्सुलिन
इन्सुलिन एक असं हार्मोन आहे जे शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतं. इन्सुलिनच्या मदतीनं शरीरात फॅटही जमा केलं जातं. फिटनेस कोचनं सांगितलं की, अतिरिक्त शुगर आणि कार्बोहायड्रेटनं हाय इन्सुलिन फॅट जमा होतं.
कोर्टिसोल
कोर्टिसोल एक स्टेरॉयड हार्मोन आहे, ज्याला तणाव वाढणारा हार्मोन म्हणूनही ओळखला जातो. तणाव वाढल्यावर फॅटचं स्टोरेजही वाढतं. खासकरून पोटावर चरबी वाढते. ही कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन आणि वॉक करा. किमान ७ ते ८ तास झोप घ्या.
लेप्टिन
लेप्टिन एक असा हार्मोन आहे जो तुमची भूक कंट्रोल करतो आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याला 'तृप्ति हार्मोन'(Satiety Hormone) असंही म्हटलं जातं. या हार्मोनमुळे ओव्हरईटिंग वाढतं.
थायरॉइड हार्मोन
कमी सक्रिय थायरॉइडमुळे मेटाबॉलिज्म स्लो होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रियाही स्लो होते. अशात तुमचं वजन कमी होत नाही.