Weight Loss: तासंतास एकाच जागी बसून काम करणं, खाण्या-पिण्याच्या चुका आणि झोपेची कमतरता यांसारख्या अनेक गोष्टींचा आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. या कारणांमुळे वजन वाढू लागतं. वजन वाढल्यानं शरीर तर ओबड-ढोबड दिसतंच, सोबतच अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड हे आजार वजन वाढल्यामुळे अधिक होतात. अशात वजन नियंत्रित ठेवणं फार गरजेचं ठरतं.
जर तुम्ही सुद्धा वजन वाढल्यानं चिंतेत असाल आणि ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असाल तर हा लेख तुमच्या कामी येऊ शकतो. फिटनेस कोच डिलन स्विनी यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यानं सकाळच्या ५ अशा सवयींबाबत सांगितलं ज्या वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकतात.
सकाळी पाळायचे पाच नियम
पाणी
फिटनेस कोचनं सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी एक ग्लास पाणी प्यायला हवं. सकाळची वेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते. यावेळी आपण शरीराचं मेटाबॉलिज्म अॅक्टिव करू शकतो, फॅट बर्निंग प्रोसेस सुरू करू शकतो. त्यामुळे सकाळी एक ग्लास पाणी खूप महत्वाचं ठरतं. सकाळी पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, भूक कमी लागते आणि शरीर अॅक्टिव होतं.
व्हिटॅमिन आणि वॉक
फिटनेस कोचनं सांगितलं की, पाणी प्यायल्यानंतर मी रोज सकाळी शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स घेतो आणि त्यानंतर कमीत कमी २० ते ३० मिनिटं पायी चालतो. योग्य व्हिटॅमिन्स घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि एनर्जी वाढते. त्यानंतर सकाळी पायी चालल्यानं फॅट बर्न होतात, मन शांत होतं आणि सूर्याच्या किरणांनी मूडही चांगला राहतो.
नाश्त्यात ३० ग्रॅम प्रोटीन
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळचा नाश्ता तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. फिटनेस कोच म्हणाला की, नाश्त्यात कमीत कमी ३० ग्रॅम प्रोटीन असायला हवं. प्रोटीन खाल्ल्यानं पोट भरलेलं राहतं, दिवसभर भूक कमी लागते आणि एनर्जी सुद्धा कायम राहते. प्रोटीनमुळे कॅलरी बर्न होण्याची प्रोसेस अधिक वेगानं होते. ज्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होते.
वर्कआउट मेडिटेशन
स्ट्रेस, तणाव या समस्यांमुळे वजन वाढतं. पोटावर चरबी जमा होते. अशात स्ट्रेस दूर करण्यासाठी मेडिटेशन करू शकता. यानं मन शांत होतं आणि स्ट्रेस कमी होतो. वजन कमी करण्यात या गोष्टीची खूप महत्वाची भूमिका असते. त्यामुळे रोज किमान ५ ते १० मिनिटं मेडिटेशन करा. तसेच रोज वर्कआउटही करा.