Join us

पोटावरील चरबी भरभर कमी करण्याची सोपी ट्रिक, जेवणानंतर एक चूक टाळा अन् स्लीम फिट रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:39 IST

Weight Loss Tips : तुम्ही सुद्धा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही वेगळा उपाय शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

Weight Loss Tips: लठ्ठपणा किंवा पोटावर वाढलेली चरबी जगभरातील लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी नको नको ते करतात. पण अनेकांना लठ्ठपणा कमी करण्यात यश मिळत नाही. कारण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. पण अशक्यही नाही. तुम्ही सुद्धा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही वेगळा उपाय शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

वेट लॉस कोच एन-मारिया टॉम यानी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून एक टिप दिली आहे. जी फॉलो करून तुम्ही अधिक वेगानं वजन कमी करू शकता. खासकरून पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यास यानं अधिक फायदा होईल.

काय आहे खास ट्रिक?

फिटनेस कोच सांगतात की, वजन वाढल्यावर लोक सगळ्यात आधी स्क्रिकक्ट डाएट फॉलो करणं सुरू करतात. पण जर तुम्ही डायटिंग करत नसाल आणि तुमच्याकडे वर्कआउटसाठी सुद्धा जास्त वेळ नसेल तर एक सोपी ट्रिक तुमच्या कामात पडू शकते.

एन-मारिया टॉम सांगतात की, जेवण केल्यावर केवळ १ हजार पावलं चालल्यास शरीराची फॅट बर्निंग प्रोसेस अॅक्विट होते. अशात तुम्ही रोज जेवण केल्यावर १ हजार पावलं चालू शकता. ज्यासाठी तुम्हाला केवळ १० ते १५ मिनिटांचा वेळ लागेल. म्हणजे इतका कमी वेळ काढून तुम्ही वेट लॉस जर्नी सोपी करू शकता.

कसा मिळतो फायदा?

फिटनेस कोट सांगतात की, जेवण केल्यानंतर शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं. जेव्हा तुम्ही जेवण झाल्यावर बसून राहता तेव्हा हे एक्स्ट्रा ग्लूकोज फॅटच्या रूपात पोटाच्या आसपास जमा होऊ लागतं. जेव्हा तुम्ही जेवण झाल्यावर लगेच पायी चालता तेव्हा ग्लूकोज थेट स्नायूंमध्ये जातं आणि शरीर त्याला फॅट बनण्याआधी एनर्जीच्या रूपात वापरतं. अशाप्रकारे जेवणानंतर केवळ १० मिनिटं पायी चालून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

कोच सांगतात की, खासकरून रात्री जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं पायी चालण्यानं सुरूवात करा. या सवयीनं पचनक्रियाही सुधारते, तसेच ब्लड शुगरही कंट्रोल राहते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यानं वजन कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स