Weight Loss Drink : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक फिट आणि हेल्दी राहण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. फिटनेसबाबत लोक बरेच जागरूक झाले असून नियमितपणे एक्सरसाईज करतात. मात्र, फक्त एक्सरसाईज करून तुम्ही फिट राहू शकत नाही. कारण फिट राहण्यासाठी योग्य खाणं-पिणंही महत्वाचं आहे. आजकाल जास्तीत जास्त लोक वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. एकदा का वजन वाढलं तर कमी करणं अवघड होऊन बसतं. इतकंच नाही तर वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. तुम्हीही वाढलेल्या वजनानं चिंतेत असाल तर एक घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत.
लिंबाचा चहा
वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लिंबाचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. लिंबाच्या चहानं वजन कमी करण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. जर कंबरेवरील चरबी कमी करायची असेल आणि पोट आत घ्यायचं असेल तर नियमितपणे लिंबाचा चहा प्या.
लिंबाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत
एक कप पाणी उकडून त्यात चहा पावडर किंवा टी बॅग टाका. ४ ते ५ मिनिटं हे कमी आसेवर उकडू द्या. नंतर गॅस बंद करा. थोडं थंड झाल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. टेस्ट वाढवण्यासाठी त्यात थोडं मध टाकू शकता. यात तुम्ही आलंही टाकू शकता. या खास चहानं पचनासंबंधी समस्या दूर होतील. हा चहा कोमट झाल्यावर प्या. हा चहा रात्री झोपण्याआधी पिऊ नका. कारण यानं तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते.
लिंबाच्या चहाचे फायदे
शरीर डिटॉक्स होतं
लिंबामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढतात. लिंबामुळे लिव्हर साफ होण्यासही मदत मिळते. लिव्हरवर जमा झालेलं फॅट यानं कमी होतं. विषारी पदार्थांमुळे शरीराचं मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. चेहऱ्यावर अॅक्ने आणि पिंपल्स येऊ लागतात. अशात लिंबाचा चहा शरीर डिटॉक्स करतो.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या चहामध्ये एस्कोरबिक अॅसिड आणि ब्लॅक टी मध्ये आढळणारे कॅटेचिन शरीराचं मेटाबॉलिज्म फास्ट करतात. शरीराचा मेटाबॉलिज्म फास्ट होणं म्हणजे शरीर अधिक कॅलरी बर्न करतं. कॅलरी इनटेकपेक्षा जास्त कॅलरी बर्न होत असतील तर वजन कमी होतं. सकाळी उपाशीपोटी हा खास चहा प्याल तर वजन वेगानं कमी होईल.
पचन तंत्र होईल मजबूत
पचन तंत्रात जर कोणतीही गडबड असेल तर वजन कमी करणं अवघड होतं. अशात लिंबाचा चहा प्याल तर पचन तंत्र मजबूत होतं. ब्लोटिंगची समस्या कमी होते आणि शरीर डिटॉक्स होतं. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतं. उपाशीपोटी जर हा चहा प्याल तर शरीराची फॅट बर्निंग प्रोसेस अधिक वेगानं होते.
शरीर हायड्रेट राहतं
वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असतं. लिंबाच्या चहा प्यायल्यानं शरीर हायड्रेटेड राहतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं आणि शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव होतो. लिंबाचा चहा प्यायल्यानं भूकही कमी होते, ज्यामुळे अनहेल्दी पदार्थ खाणं टाळलं जातं.