Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, पचनही सुधारते

सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, पचनही सुधारते

Drinking Warm Water On An Empty Stomach In the Morning : रोजच्या रुटीनमध्ये काही छोट्या छोट्या सवयींचा अवलंब करून तुम्ही बरेच फायदे मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:08 IST2026-03-26T14:57:53+5:302026-03-26T19:08:51+5:30

Drinking Warm Water On An Empty Stomach In the Morning : रोजच्या रुटीनमध्ये काही छोट्या छोट्या सवयींचा अवलंब करून तुम्ही बरेच फायदे मिळवू शकता.

Drinking Warm Water On An Empty Stomach In the Morning Can See These Changes In The Body | सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, पचनही सुधारते

सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, पचनही सुधारते

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊन दिवसांची सुरूवात करायला हवी. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायले तर तब्येतीला बरेच फायदे मिळतात. फक्त १ ग्लास कोमट पाणी प्यायल्यानं तुम्हाला बऱ्याच आजारांपासून सुटका मिळू शकते. रोजच्या रुटीनमध्ये काही छोट्या छोट्या सवयींचा अवलंब करून तुम्ही बरेच फायदे मिळवू शकता. (Drinking Warm Water On An Empty Stomach)

रोज सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यानं शरीरात काय काय बदल होतात समजून घेऊ. पाणी पिताना काही गोष्टी खबरदारी घ्यायला हवी. अन्यथा  याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. पाणी जास्त गरम असू नये, कोमट असायला हवं, सकाळी उठल्यानंतर ब्रश करून नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. (Drinking Warm Water On An Empty Stomach In the Morning Can See These Changes In The Body)

इम्युनिटी वाढते

आरोग्यतज्ज्ञ सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं इम्यून सिस्टीम मजबूत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते  तसंच शरीर आतून स्वच्छ होतं आणि पूर्ण दिवस तुम्ही एनर्जेटीक राहता.

पचनक्रिया चांगली राहते

अनेकांना पचनाच्या संबंधित समस्या असतात. रोज कोमट पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. तसंच एसिडीटी, गॅसची समस्याही उद्भवत नाही.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

 रिकाम्या पोटी कोमट पाण्याचं सेवन केल्यानं मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म सुधारतो. कॅलरीज वेगानं बर्न होण्यास मदत होते, भूक कमी लागते तसंच बराचवेळ पोट भरलेलं राहतं.

 त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते

जर तुम्हाला तुमची त्वचा ग्लोईंग आणि चमकदार हवी असेल तर तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्याचे सेवन करू शकता यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. चेहरा चमकदार होण्यासोबतच सुरकुत्या कमी होणं तसंच डागांच्या समस्याही कमी होतात.

ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते

सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीराल ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो तसंच शरीराच्या सर्व अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो. शरीरात पाणी कमी झाल्यास  रक्तप्रवाहातही अडथळे येऊ शकतात. म्हणून सकाळी न चुकता कोमट पाणी प्यावं.

Web Title : सुबह खाली पेट गर्म पानी क्यों पिएं: 5 कारण

Web Summary : सुबह खाली पेट गर्म पानी पीने से रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है, पाचन क्रिया में सुधार होता है, वजन कम होता है, त्वचा हाइड्रेटेड रहती है और रक्त परिसंचरण बेहतर होता है। बेहतर स्वास्थ्य के लिए एक सरल सुबह की आदत।

Web Title : Why drink warm water on an empty stomach: 5 reasons

Web Summary : Drinking warm water on an empty stomach boosts immunity, aids digestion, promotes weight loss, hydrates skin, and improves blood circulation. A simple morning habit for better health.