वजन कमी करण्यासाठी, शरीरातील चरबी वितळवण्यासाठी किंवा डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर आपण भरपूर प्रमाणात पाणी पितो. (Lemon water side effects) अनेकदा फिटनेसबद्दल जागरुक असणारे लोक लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायाल्याने वजन झटक्यात कमी होतं असं देखील म्हटलं जातं. लिंबू पाणी पिण्याचे शरीराला असंख्य फायदे आहेत.(Lemon water for weight loss dangers) यामध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. पचनसंस्था सुधारून शरीराला हायड्रेट ठेवते. (Symptoms from drinking too much lemon water)
लिंबू पाणी हे सर्वांसाठी फायदेशीर नाही. जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने प्यायल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.(Harmful effects of lemon water daily) जर आपणही रोज लिंबू पाणी पित असू आणि ही ५ लक्षणं वारंवार जाणवत असतील तर वेळीच थांबायला हवं. अन्यथा शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. (Natural weight loss tips)
बेबोची फिगर एक नंबर! ऋजुता दिवेकर सांगतात, करिना कपूरचा वर्षानुवर्षे एकच डाएट प्लान, खाते तेच पण..
1. आपले दात आधीपेक्षा जास्त कमकुवत झाले असतील किंवा त्यांचा रंग बदलला असेल तर लिंबू पाणी पिणे थांबवायला हवे. लिंबूमध्ये तीव्र आम्लता असते ज्यामुळे दातांचे इनॅमल खराब होऊ शकते. त्यामुळे दातात पोकळी तयार होणे, वेदना होण्याची समस्या वाढते.
2. जर आपल्या छातीत सारखी जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर लिंबू पाणी पिऊ नका. यामुळे पोटाचे आणि अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे छातीत जळजळ, गॅस आणि पोटफुगीची समस्या उद्भवू शकते.
3. आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर जास्त लिंबू पाणी प्यायाल्याने ही समस्या वाढू शकते. लिंबूमध्ये असलेले आम्ल त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी करतात. यामुळे त्वचेला खाज सुटणे, जळजळ होण्याच्या समस्या वाढतात.
घोटभर पाणी प्यायलं तरी लगेच लघवी लागते, सतत लघवीला जावं लागतं? ७ गोष्टी आजच बदला..
4. लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळांपासून अॅलर्जी असेल तर आपण लिंबू पाणी पिऊ नये. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा सूज येऊ शकते. तसेच यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
5. लिंबाच्या आम्लतेमुळे आपल्या नखांवर परिणाम होतो. जर आपण लिंबू पाणी पीत असाल तर नखे लगेच तुटतील. किंवा त्यांचा कोरडेपणा वाढेल. तर हे लिंबू पाणी पिण्याचे परिणाम असू शकतात.