आजकाल बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अपचन या तक्रारी अनेकांना सतावत आहेत. त्यावर अनेक उपाय आपण करुन पाहतो. महागड्या ट्रिटमेंटस घेतो मात्र काही दिवसात पुन्हा त्रास सुरु होतो. काही सोपे आणि जुने विश्वासू उपाय आहेत जे करण्याचा कायमस्वरुपी फायदा मिळतो. अशा वेळी घरगुती आणि सोपा उपाय म्हणून धणे-जिरे पाणी उपयुक्त ठरते. (Drink 'this' water every morning for 30 days and see how your digestion improves and you will lose weight, the solution is simple and worth lakhs)स्वयंपाकघरात सहज मिळणारे धणे आणि जिरे पचनसंस्थेवर सौम्य पण परिणामकारक परिणाम करतात, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
धण्यामध्ये नैसर्गिक तंतू आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारण्यास हातभार लावतात. जिरे पचनरसांची निर्मिती वाढवते आणि अन्न नीट पचण्यास मदत करते. या दोन्हींचे पाणी नियमित प्यायल्यास गॅस, अॅसिडिटी आणि पोट जड वाटणे अशा समस्या हळूहळू कमी होतात. पोट नीट साफ होत असल्याने शरीरातील अनावश्यक साठलेले घटक बाहेर टाकले जातात. धणे - जिरे एकत्र भाजून त्याची पूड तयार करायची. कपभर पाण्यात चमचाभर पूड घालून उकळायची. नंतर गाळून ते गरमागरम पाणी प्यायचे. पचनाच्या तक्रारी नक्की कमी होतील. धणे-जिरे पाणी वजन कमी करण्याच्या दृष्टीनेही फायदेशीर मानले जाते. पचन सुधारले की चयापचयाची गती वाढते, ज्याचा थेट परिणाम वजनावर होतो. हे पाणी शरीरातील अतिरिक्त पाणी धरुन ठेवण्याची सवय कमी करते, त्यामुळे सूज आणि पोट फुगण्याचे प्रमाण कमी करते. भूक नियंत्रित राहण्यासही याची मदत होते, ज्यामुळे अति खाणे टाळले जाते. हे पाणी वजन कमी करण्यासाठी एकदम मस्त पर्याय आहे.
मात्र केवळ धणे-जिरे पाणी पिऊन वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यासोबत संतुलित आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तेलकट, गोड आणि जड पदार्थ कमी करुन भाजीपाला, डाळी, फळे यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. पाणी नियमित पिणे आणि वेळेवर जेवण करणेही पचनासाठी उपयुक्त ठरते. यासोबत हलका व्यायाम केल्यास या पाण्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे मिळतो. रोज चालणे, सूर्यनमस्कार, योगासने किंवा साधे स्ट्रेचिंग केल्याने पचनसंस्था सक्रिय राहते. हालचाल कमी असेल तर पाणी पिऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. एकूणच धणे-जिरे पाणी हे पोट साफ होण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी एक नैसर्गिक सहाय्यक उपाय आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांची जोड दिल्यास त्याचे फायदे नक्कीच जाणवतात. आरोग्य सुधारण्यासाठी छोटे पण सातत्यपूर्ण बदल केल्यास शरीर स्वतःच सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते.
Web Summary : Cumin-coriander water aids digestion and weight loss. Drink daily for improved gut health, reduced bloating, and boosted metabolism. Combine with balanced diet and exercise for best results.
Web Summary : जीरा-धनिया पानी पाचन और वजन घटाने में सहायक है। बेहतर पेट स्वास्थ्य, सूजन कम करने और चयापचय को बढ़ावा देने के लिए रोजाना पिएं। सर्वोत्तम परिणामों के लिए संतुलित आहार और व्यायाम के साथ मिलाएं।