lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चिमुटभर हळदीने थुलथुलीत पोट कमी होते? नक्की खरं काय? वेट लॉससाठी हळदीचा वापर कसा करावा?

चिमुटभर हळदीने थुलथुलीत पोट कमी होते? नक्की खरं काय? वेट लॉससाठी हळदीचा वापर कसा करावा?

Does Turmeric Have Weight Loss Benefits : हळद फक्त पदार्थाची चव आणि रंग वाढवत नसून, आरोग्य आणि वजन कमी करण्यासही मदत करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 06:17 PM2024-04-01T18:17:16+5:302024-04-01T18:18:00+5:30

Does Turmeric Have Weight Loss Benefits : हळद फक्त पदार्थाची चव आणि रंग वाढवत नसून, आरोग्य आणि वजन कमी करण्यासही मदत करते

Does Turmeric Have Weight Loss Benefits? | चिमुटभर हळदीने थुलथुलीत पोट कमी होते? नक्की खरं काय? वेट लॉससाठी हळदीचा वापर कसा करावा?

चिमुटभर हळदीने थुलथुलीत पोट कमी होते? नक्की खरं काय? वेट लॉससाठी हळदीचा वापर कसा करावा?

भारतीय घरामध्ये मसाल्याला अधिक महत्व आहे (Weight Loss Tips). मसाले फक्त पदार्थाची चव वाढवत नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यापैकीच एक हळद. हळदीचा वापर स्वयंपाक, त्वचा आणि केसांसाठीही होतो. पण हळदीचा वापर कधी वजन कमी करण्यासाठी करून पाहिलं आहे का? सध्या अनेकजण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत (Turmeric Benefits).

वजन कमी करण्यासाठी बरेचजण विविध उपायांचा अवलंब करतात. परंतु, आपल्याला माहित आहे का? मसाल्याच्या डब्यातील चिमुटभर हळदही वजन कमी करण्यासाठी पुरेशी आहे. हळदीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि एंटी-इन्फ्लेमेटरी हे गुणधर्म असतात. जे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करतात. पण वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा? पाहूयात(Does Turmeric Have Weight Loss Benefits).

हळद वजन कमी करण्यास कसे मदत करते?

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे बायोएक्टिव्ह कंपाऊंड आढळते. संशोधनानुसार, कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि चयापचय वाढवणारे गुणधर्म असतात. हे दोन्ही गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

सूज कमी करते

लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्यांना अनेकदा शरीरात सूज येण्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून हळद फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकते. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने चालते होते.

चयापचय बुस्ट करते

शरीराची चयापचय जितकी जलद होईल तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतात. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील चरबी लवकर बर्न होऊ लागते.

वेट लॉससाठी हळदीचे सेवन कसे करावे?

हळदीचे पाणी

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि थोडे लिंबू टाकून प्या. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.

हळद दूध

एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि थोडी दालचिनी पावडर घालून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईलच पण चांगली झोप येण्यासही मदत होईल.

ना उडीद डाळ -ना सोडा; १५ मिनिटात करा इन्स्टंट मेदू वडे; ऑथेटिंक चव, क्रिस्पी वडे

आहारात समाविष्ट करा

भाज्या आणि कडधान्यांमध्ये हळदीचा नियमित समावेश करा. यामुळे पदार्थाची चव तर वाढेलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल.

हळदीचे सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

- हळद सुरक्षित मानली जात असली तरी तिचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ किंवा आम्लपित्त होऊ शकते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करू नका.

- गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी हळद घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Does Turmeric Have Weight Loss Benefits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.