Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आपल्यालाही वाटतं का पोटावर झोपल्याने पोटावरील चरबी कमी होते? खरंच असं होतं की फक्त अफवा

आपल्यालाही वाटतं का पोटावर झोपल्याने पोटावरील चरबी कमी होते? खरंच असं होतं की फक्त अफवा

Belly Fat : काही लोक वेगळे ऐकीव सल्लेही फॉलो करतात. त्यातीलच एक सल्ला म्हणजे पोटावर झोपल्याने वाढलेलं पोट कमी होतं. पण खरंच पोटावर झोपल्याने पोट कमी होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:19 IST2025-11-18T12:08:21+5:302025-11-18T12:19:43+5:30

Belly Fat : काही लोक वेगळे ऐकीव सल्लेही फॉलो करतात. त्यातीलच एक सल्ला म्हणजे पोटावर झोपल्याने वाढलेलं पोट कमी होतं. पण खरंच पोटावर झोपल्याने पोट कमी होतं का?

Does sleeping on your stomach reduce belly fat? | आपल्यालाही वाटतं का पोटावर झोपल्याने पोटावरील चरबी कमी होते? खरंच असं होतं की फक्त अफवा

आपल्यालाही वाटतं का पोटावर झोपल्याने पोटावरील चरबी कमी होते? खरंच असं होतं की फक्त अफवा

Belly Fat : वजन किंवा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतात, तर कुणी डाएट करतात. तर काही लोक वेगळे ऐकीव सल्लेही फॉलो करतात. त्यातीलच एक सल्ला म्हणजे पोटावर झोपल्याने वाढलेलं पोट कमी होतं. पण खरंच पोटावर झोपल्याने पोट कमी होतं का? आयुर्वेदाचार्य आणि जीवा आयुर्वेदचे संस्थापक डॉ. प्रताप चौहान सांगतात की अनेक लोक त्यांच्याकडे हा एकच प्रश्न घेऊन येतात. 

यावर ते म्हणतात, “वजन कमी करण्यासाठी लोक शॉर्टकट शोधतात, पण शरीर कधीच सोप्या मार्गाने बदलत नाही. आयुर्वेदात वजनाला फक्त एका पोजिशनने जोडून पाहत नाही, तर तुमचं पचन, तुम्ही काय खाता, कसे झोपता, किती ताण घेता यावर वजन अवलंबून असतं.”

म्हणून पोटावर झोपल्याने वजन कमी होते ही गोष्ट खरी मानण्याआधी हे समजून घेणे आवश्यक आहे की शरीरातील चरबी फक्त दबावाने कमी होत नाही. बेली फॅट खरं तर शरीराच्या आतल्या कारणांमुळे वाढत किंवा घटत असते, झोपेच्या पोजिशनवर नाही. अशात चला तर मग समजून घेऊया की बेली फॅट कमी करण्याचे खरे उपाय कोणते.

पोटावर झोपल्याने वजन कमी होते का?

काही लोकांचा समज आहे की पोटावर झोपल्याने पोटावर दाब पडतो आणि फॅट कमी होऊ लागते. पण हे चुकीचं आहे. चरबी म्हणजे फक्त मऊ ऊतक, ती दाबून कमी होत नाही. चरबी कुठे, किती आणि कशी जमा होईल हे तुमचे पचन, हार्मोन्स आणि मेटाबॉलिझम ठरवतात. पोटावर झोपणे काहींना आरामदायक वाटू शकते, पण दीर्घकाळ असं केल्याने मणक्यांवर आणि मानेवर ताण वाढून वेदना होऊ शकतात. म्हणून पोटावर झोपल्याने बेली फॅट कमी होते हे पूर्णपणे चुकीचे आहे.

आयुर्वेदानुसार बेली फॅट का वाढते?

डॉ. प्रताप चौहान यांच्या मते बेली फॅट वाढण्याचे कारण कफ दोषाचे असंतुलन असते. अग्नि म्हणजेच डायजेस्टिव फायर कमजोर झाल्यास अन्न नीट पचत नाही आणि चरबी जमा होऊ लागते. उशिरा जेवणे, उशिरा झोपणे, ताणात राहणे हे सर्व गोष्टी अग्नि कमी करतात. पचन मंदावल्यावर अन्न शरीरात साचते आणि खासकरून पोटाभोवती चरबी वाढू लागते.

झोपेचा वजनावर इतका प्रभाव का पडतो?

वजन कमी करताना लोक डाएट आणि एक्सरसाइजवर लक्ष देतात, पण झोपेचे महत्त्व विसरतात. झोप कमी झाल्यास कोर्टिसोल हार्मोन वाढतात, जे ताण वाढवतात आणि बेली फॅट साठवण्यात मोठी भूमिका निभावतात. उशिरा झोपणे, मोबाईलवर स्क्रोल करत झोपणे, उशिरा जेवणे या गोष्टींमुळे मन अस्थिर होतं. आयुर्वेद सांगतं की मन शांत असणे आणि वेळेवर झोपणे वजन नियंत्रणासाठी आवश्यक आहे. जेव्हा झोप चांगली होते, पचन सुधारते आणि शरीरात ऊर्जा वाढते तेव्हा वजनही हळूहळू कमी होऊ लागते.

बेली फॅट कमी करण्यासाठी काय करावे?

- सकाळी हलकी चाल किंवा योगा यामुळे शरीर हलकं वाटतं आणि मेटाबॉलिझम सक्रिय होतो.

- दिवसभर कोमट पाणी प्या. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं.

- आहारात पचन सुधारक मसाले वापरा. ओवा, दालचिनी, बडीशेप हे तिघेही पचन आणि मेटाबॉलिझम सुधारतात.

- हलका, ताजा आणि गरम आहार घ्या. पचायला सोपा असल्याने पोट फुगणे आणि चरबी वाढणे कमी होते.

- कोल्ड ड्रिंक्स, फ्रिजमधील पदार्थ आणि तळलेले पदार्थ कमी करा. हे सर्व पचन मंदावतात आणि कफ वाढवतात.

Web Title: Does sleeping on your stomach reduce belly fat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.