Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करत असताना रात्री किती वाजता जेवायला हवं? योग्य वेळ पाळा अन् लठ्ठपणा टाळा!

वजन कमी करत असताना रात्री किती वाजता जेवायला हवं? योग्य वेळ पाळा अन् लठ्ठपणा टाळा!

Right Time For Dinner : दुपारचं जेवण असो वा रात्रीचं जेवणाची वेळ फिक्स असली पाहिजे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी जेवणाची वेळ पाळणं खूप महत्वाचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:49 IST2025-05-06T13:48:12+5:302025-05-06T13:49:17+5:30

Right Time For Dinner : दुपारचं जेवण असो वा रात्रीचं जेवणाची वेळ फिक्स असली पाहिजे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी जेवणाची वेळ पाळणं खूप महत्वाचं असतं.

Doctor told best time to eat dinner for weight loss | वजन कमी करत असताना रात्री किती वाजता जेवायला हवं? योग्य वेळ पाळा अन् लठ्ठपणा टाळा!

वजन कमी करत असताना रात्री किती वाजता जेवायला हवं? योग्य वेळ पाळा अन् लठ्ठपणा टाळा!

Right Time For Dinner : कामाच्या वाढत्या वेळा, कामाचं टेंशन, ऑफिस ते घर जाण्या-येण्याची वाढलेली वेळ यामुळे दिवसभराचं सगळं शेड्युलच बदलून जातं. ना वेळेवर नाश्ता करायला मिळत, ना जेवण. आधी लोक सकाळी लवकर झोपेतून उठत होते, सकाळचा नाश्ता करत होते आणि रात्री सुद्धा लवकर जेवण करून झोपत होते. ज्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहत होती आणि ते फीटही राहत होते. पण आजकालच्या चुकलेल्या टाइमटेबलमुळे तब्येतीवर चांगलाच प्रभाव बघायला मिळतो. रात्री लोक जेव्हा घरी येतात तेव्हा उशीरा जेवण करतात आणि लगेच झोपतात. पण हेही चुकीच आहे. कारण दुपारचं जेवण असो वा रात्रीचं, जेवणाची वेळ फिक्स असली पाहिजे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी जेवणाची वेळ पाळणं खूप महत्वाचं असतं.

डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, रात्री उशीरा जेवण करणाऱ्या लोकांच्या शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. डॉक्टर सांगतात की, रात्री उशीरा जेवल्यानं आणि लगेच झोपल्यानं वजन वेगानं वाढतं. त्यांनी हेही सांगितलं की, रात्री उशीरा जेवत असाल तर काय खायला हवं.

रात्री उशीरा जेवल्यानं काय होतं?

डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, रात्री 8 वाजतानंतर जेवण करत असाल तर शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे आपण जे काही खातो ते योग्यपणे पचन होत नाही आणि चरबी वाढू लागते.

डॉक्टरांनी सांगितलं की, एका रिसर्चमध्ये लोकांचे दोन ग्रुप केले गेले आणि त्यांना समान कॅलरी असलेलं जेवण देण्यात आलं. एका ग्रुपमधील लोकांनी रात्रीचं जेवण 7 वाजता केलं, तर दुसऱ्यांनी रात्री 10 वाजता. जे उशीरा जेवले त्यांचं वजन लवकर वाढल्याचं यातून आढळून आलं.

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

या रिसर्चमधून समोर आलं की, रात्रीचं जेवण 7 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न केल पाहिजे. जर एखाद्या दिवशी या वेळेत जेवण करता आलं नाही तर रात्री हलकं जेवण करावं. यात सूप, सलाद यांचा समावेश करू शकता. त्याशिवाय रात्री जेवण केल्यावर लगेच झोपू नका.

जेवण आणि झोपण्यात किती गॅप असावा?

बरेच लोक रात्रीचं जेवण झालं की, लगेच झोपण्याची तयारी करतात. पण असं करणं एकंदर आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. अशात जेवण केल्यावर किती वेळानं झोपलं पाहिजे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर डॉक्टर सांगतात की, रात्रीचं जेवण आणि झोपण्यात साधारण 2 ते 3 तासांचा गॅप असायला हवा.

Web Title: Doctor told best time to eat dinner for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.