Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी

छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी

Cloves for weight loss :डॉ. सलीम जैदी यानी छोटीशी जडी-बुटी असलेल्या लवंगाचे आरोग्याला होणारे फायदे याबाबत माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:49 IST2025-04-02T11:23:43+5:302025-04-03T18:49:23+5:30

Cloves for weight loss :डॉ. सलीम जैदी यानी छोटीशी जडी-बुटी असलेल्या लवंगाचे आरोग्याला होणारे फायदे याबाबत माहिती दिली आहे.

Doctor told 3 ways to eat cloves for weight loss and strong digestion | छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी

छोटीशी लवंग आहे भारी तिखट आणि कामाची! पाहा लवंग कोणत्या आजारात ठरते औषध गुणकारी

Cloves for weight loss : लवंगचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. बरेच लोक जेवण झाल्यावर मुखवास म्हणूनही लवंग खातात. पण लवंगाचे इतरही अनेक फायदे अनेकांना माहीत नसतात. लवंग वजन कमी करण्यासोबतच इन्फेक्शन दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात. अशात वजन कमी करण्यासाठी लवंग कशी फायदेशीर ठरते हे जाणून घेऊया.

डॉ. सलीम जैदी यानी छोटीशी जडी-बुटी असलेल्या लवंगाचे आरोग्याला होणारे फायदे याबाबत माहिती दिली आहे. आयुर्वेदानुसार, लवंग एक शक्तिशाली जडी-बुटी आहे. ज्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो.

पचन आणि सर्दी-पडसा

नियमितपणे लवंग खाल्ल्यानं तुमचं पचन तंत्र मजबूत होतं आणि गॅस-अ‍ॅसिडिटीसारख्या नेहमी होणाऱ्या समस्याही दूर होतात. लवंगमध्ये यूजेनॉल नावाचं तत्व असतं, जे घशाला आराम देतं आणि कफ पातळ करण्यास मदत करतं. त्यामुळे सर्दी-पडसा असेल तर तेव्हा याचा वापर करावा.

दातांचं दुखणं होईल दूर

दातांच्या दुखण्यामुळे अनेक लोक नेहमीच चिंतेत असतात. ना त्यांना काही खाता येत नाही काही पिता येत. अशात दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते. तसेच यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे शरीरात इम्यूनिटी सुद्धा वाढते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून तुमचा बचाव होतो.

वजन कमी होतं

वजन कमी करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर ठरत असल्याचं डॉक्टर नेहमीच सांगतात. लवंग मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याचं काम करते आणि त्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगानं होते. ज्यामुळे वजनही वेगानं कमी होऊ शकतं.

कसा कराल वापर?

एक्सपर्ट सांगतात की, रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 लवंग चावून खाव्यात. तसेच लवंगचं पाणी सुद्धा उपाशीपोटी पिऊ शकता. त्यासोबतच जेवण झाल्यावर मुखवास म्हणूनही खाऊ शकता. 

Web Title: Doctor told 3 ways to eat cloves for weight loss and strong digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.