Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज घरचं जेवण करूनही वजन कमी होत नाहीये? डॉक्टरांनी सांगितले जेवणाबाबतचे ४ महत्वाचे नियम

रोज घरचं जेवण करूनही वजन कमी होत नाहीये? डॉक्टरांनी सांगितले जेवणाबाबतचे ४ महत्वाचे नियम

Weight Loss Diet : अलिकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये समोर आलेल्या ICMR च्या एका रिपोर्टमधून भारतीय जेवणाबाबत एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. जे वाचून आपणही विचारात पडाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:19 IST2025-12-29T12:12:22+5:302025-12-29T12:19:31+5:30

Weight Loss Diet : अलिकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये समोर आलेल्या ICMR च्या एका रिपोर्टमधून भारतीय जेवणाबाबत एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. जे वाचून आपणही विचारात पडाल.

Doctor shared 4 tips to make your diet healthy | रोज घरचं जेवण करूनही वजन कमी होत नाहीये? डॉक्टरांनी सांगितले जेवणाबाबतचे ४ महत्वाचे नियम

रोज घरचं जेवण करूनही वजन कमी होत नाहीये? डॉक्टरांनी सांगितले जेवणाबाबतचे ४ महत्वाचे नियम

Weight Loss Diet : आजकाल वाढत्या वेगवेगळ्या आजारांमुळे सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, घरच जेवणच हेल्दी असतं. घरच्या साध्या जेवणातून शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं. पण खरंच घरचं जेवण पोषण देणारं असतं का? अलिकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये समोर आलेल्या ICMR च्या एका रिपोर्टमधून भारतीय जेवणाबाबत एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. जे वाचून आपणही विचारात पडाल.

या अहवालानुसार, सरासरी भारतीयांच्या ताटात सुमारे 62 टक्के कॅलरी फक्त कार्बोहायड्रेट्समधून येतात, तर प्रोटीन आणि हेल्दी फॅटचं प्रमाण चिंताजनकपणे कमी आहे. याच असंतुलनामुळे हळूहळू लठ्ठपणा, डायबिटीस आणि इतर लाइफस्टाइल आजारांचा धोका वाढतो. अशा स्थितीत डॉ. अक्षय केवलानी सांगत आहेत की ताटात छोटे बदल करून आहार कसा अधिक हेल्दी करता येईल.

घरच्या जेवणात पोषणाची कमतरता?

घरचं जेवण स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेलं आणि ताजं असतं, त्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. पण विचार न करता त्याला ‘हेल्दी’ म्हणणे योग्य नाही. आपल्या रोजच्या जेवणात भात, चपाती, डोसा, पोहे, डाळ असे पदार्थ असतात; मात्र यापैकी 70–80 टक्के भाग कार्बोहायड्रेट्सचा असतो. त्यातच जास्त मीठ आणि तेल वापरल्याने पोषणाचं संतुलन आणखी बिघडतं. अशात शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट पुरेसे मिळत नाहीत.


ताट हेल्दी कसं बनवावं?

काय कमी करावे?

सर्वात आधी तेल आणि मिठाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. चवीसाठी आपण अनेकदा यांचा अतिरेक करतो. पूर्णपणे बंद करणं अवघड असलं तरी हळूहळू प्रमाण कमी करणं हा चांगला पर्याय आहे. कमी तेल-मिठाचे जेवण हृदयासाठी चांगलं असून वजन आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

कशाचे प्रमाण वाढवावे?

प्रोटीन हा आपल्या आहारातील सर्वात जास्त दुर्लक्षित घटक आहे. शरीराला दररोज प्रति किलो वजनामागे सुमारे 1 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं. फिटनेस किंवा मसल बिल्डिंग करत असाल तर ही गरज आणखी वाढू शकते. प्रत्येक जेवणात किमान एक प्रोटीन स्रोत ठेवा उदा. डाळी, पनीर, टोफू, दूध, दही.

आहारात काय जोडावे?

कच्च्या किंवा हलक्या वाफवलेल्या भाज्या जेवण संतुलित करण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक असतात. शिवाय भाज्या खाल्ल्याने तेल आणि मिठाचा वापर आपोआप कमी होतो. सॅलड, उकडलेल्या भाज्या किंवा हलकी भाजी रोजच्या जेवणात समाविष्ट करा.

काय बदल करावे?

दररोज गहू आणि भाताऐवजी मोट्या धान्यांना संधी द्या. रागी, बाजरी, ज्वारी यांसारखी धान्ये पोषणदृष्ट्या अधिक चांगली आहेत. ती ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि पोट जास्त काळ भरलेले ठेवण्यास मदत करतात.

Web Title : घर का खाना खाने पर भी वज़न कम नहीं होता? डॉक्टरों ने बताए 4 नियम

Web Summary : घर के खाने में संतुलित पोषण की कमी हो सकती है। कार्बोहाइड्रेट्स के बजाय प्रोटीन, फाइबर और स्वस्थ वसा को प्राथमिकता दें। तेल और नमक कम करें। बेहतर स्वास्थ्य और वजन प्रबंधन के लिए विभिन्न अनाज और सब्जियां शामिल करें।

Web Title : Weight loss despite home food? Doctors share 4 diet rules.

Web Summary : Home food may lack balanced nutrition. Prioritize protein, fiber, and healthy fats over carbohydrates. Reduce oil and salt. Include diverse grains and vegetables for better health and weight management.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.