दिवाळी झाली, भरपूर खाल्लं, मज्जा केली पण आता मात्र आपल्याला काहीही झालं तरी आपल्याला वजन कमी करायलाच हवं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तसं काहीही करु नका. आता फक्त दिवाळीच्या आधी जे करत होतात तेच करा. याचे कारण म्हणजे दिवाळीत आपले रुटीन, आहार सगळेच बदललेले असते आणि अचानक आपण वजन कमी करण्यासाठी जोरदार व्यायाम किंवा एकदम कडक डाएट सुरु केले तर ते अंगाशी येऊ शकते असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे म्हणणे आहे. दिवाळीत आहार-विहारात झालेला बदल आणि आता एकदम नव्याने पुन्हा होणारा बदल हा शरीराला झेपेलच असे नाही. त्यामुळे एकदम केवळ सॅलेड खाणे, बरेच तास काहीही न खाणे, केवळ फलाहार घेणे असे प्रयोग उपयोगाचे नाहीत. सुरुवातीला आपण दिवाळी आधी जो आहारविहार घेत होतो तोच कायम ठेवायला हवा.
वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी योग्य पद्धत वापरायला हवी. यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैली यांचा ताळेबंध बांधायला हवा. हे तीनही व्यवस्थित असेल तर तुमच्या शरीरातील ताकद आणि वजन यांचे गुणोत्तर व्यवस्थित राहण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला पाठदुखी, मायग्रेम, रक्तदाब, वंध्यत्व, हार्मोनचे असंतुलन, अनिमित पाळी येणे अशा वेगवेगळ्या समस्या असतात. यांसाठी आपण डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला सगळ्यात आधी वजन नियंत्रणात आणायला सांगतात. यामध्ये बोन वेट म्हणजेच आपल्या हाडांचे वजन आणि मसल वेट म्हणजे स्नायूंचे वजन असे दोन घटक असतात. हे दोन्ही घटक योग्य प्रमाणात असतील तर तुम्ही तदुरुस्त असता. शरीराची ताकद आणि वजन योग्य प्रमाणात असेल तर खालील लक्षणे दिसतात...
१. तुम्हाला सतत गोड खावेसे वाटत नाही.२. महिलांना मासिक पाळी नियमित येते३. गाढ आणि चांगली झोप लागते४. शरीरातील ऊर्जा वाढते५. केस आणि त्वचा चांगली होते ६. मूड चांगला राहतो. ७. तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करु शकता८. अॅसिडीटी, ब्लोटींग आणि बद्धकोष्ठता हे त्रास दूर होतात.