वजन कमी करण्याचं (Weight Loss) सिक्रेट आपल्या किचनमध्येच लपलेलं आहे. फॅन्सी डाएट, महाग सप्लिमेंट्स आणि हेवी वर्कआऊटने नाही तर किचनमधल्या हेल्दी मसाल्यांनी तुम्ही वजन सहज कमी करू शकता. मसाल्यांमुळे फक्त वजनच कमी होत नाही तर आरोग्यही चांगले राहते, मेटाबॉलिझ्म चांगला राहतो, पचनक्रिया सुधारते, वजन कमी होतं.... याशिवाय इतर अनेक फायदे मिळतात. (Detox Drink To Lose 2 Kgs In 2 Weeks)
किचनमध्ये उपलब्ध असलेले ३ पदार्थ पाण्यात मिसळून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सर्टिफाईड आहारातज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. वजन कमी करण्यासाठी पाण्यात ४ पदार्थ मिसळा, तब्येत चांगली राहील. (How To Loss Weight With Detox Drink)
जिऱ्यातील थायमॉल आणि अन्य कम्पाऊंड्स वजन कमी करण्यास मदत करतात. जिऱ्यामुळे मेटबॉलिक रेट वाढतो आणि चरबी जळण्यास मदत होते. हे पाणी शरीर डिटॉक्स करते. पचनक्रिया चांगली राहते. हे ड्रिंक, ब्लॉटींग, गॅस, एसिडीटी, पोटाशी संबंधित समस्यांवर गुणकारी ठरते. ओव्यात फायबर्स,व्हिटामीन्स, एंटी ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात ज्यामुळे वजन कमी होतं.
दात किडले, हिरड्या काळपट पडल्या? ४ उपाय, दातांची दुखणी आणि खर्च वाढणार नाही
बडिशेपेच्या बिया भूक कंट्रोल करण्यास मदत करतात ज्यामुळे लठ्ठपणाही उद्भवत नाही. शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडतात. एक्सपर्ट्स या ड्रिंकला फॅट कटर ड्रिंक म्हणतात. मेथी दाणे शरीराला डिटॉक्स करतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि वजन कमी होते.
वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा डिटॉक्स ड्रिंक
१) पाणी - २ कप
२) बडिशेप- १ टिस्पून
३) ओवा - १ टिस्पून
४) मेथी दाणे- १ टिस्पून
५) जीरं - १ टिस्पून
हे सर्व साहित्य पाणी अर्ध होईपर्यंत पाण्यात उकळवून घ्या नंतर गाळून घ्या. तयार आहे डिटॉक्स ड्रिंक..... ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल, हेल्दी डाएटसोबतच वजन कमी राहील, रात्री झोप पूर्ण घेता येईल याशिवाय आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.