Join us

तुमच्या मुलांना लोक ढेरपोट्या म्हणून चिडवतात? हे घ्या मुलांचं सुटलेलं पोट कमी करण्याचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:15 IST

Obesity in children: लठ्ठपणा आपल्यासोबत हृदयरोग, डायबिटीस, दमा, हार्ट अटॅक अशा समस्याही घेऊन येतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी जमेल ते उपाय केले पाहिजे.

How to reduce obesity in children: बाहेर गेल्यावरच कशाला घरात एकत्र राहणाऱ्या कुटुंबात एक नजर मारली तर लठ्ठपणा वाढलेले लोक दिसून येतील. जगभरात दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या गंभीर होताना दिसत आहे. लहान मुलं असो वा वयस्क वा वृद्ध सगळेच या समस्येचे शिकार होताना दिसत आहेत. लॅंसेटच्या एका ताज्या रिपोर्टनुसार, भारतात पुढील २५ वर्षात म्हणजे २०५० मध्ये ४४ टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार होतील. लठ्ठपणा आपल्यासोबत हृदयरोग, डायबिटीस, दमा, हार्ट अटॅक अशा समस्याही घेऊन येतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी जमेल ते उपाय केले पाहिजे. दुसरीकडे आज आम्ही तुम्हाला लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणं आणि तो कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहोत.

मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणं

मोठ्यांसोबतच लहान मुलं-मुली सुद्धा लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. अलिकडेच समोर आलेल्या एक रिपोर्टनुसार, गेल्या १० वर्षात मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा स्पीड वाढला आहे. याची मुख्य कारणं मोबाइल, टीव्ही आणि गॅजेट्सचा खूप जास्त वापर हा मानला जातो. पालक स्वत: जर या गोष्टींचा सतत वापर करत असतील तर घरातील लहान मुलांना सुद्धा हीच सवय लागायला वेळ लागत नाही. त्याशिवाय जंक फूड्स, चिप्स, नूडल्स, कोल्डड्रिंक यामुळेही मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मुलांचं मैदानात खेळणंही कमी झालं आहे.

मुलांचं शरीर का फुगतं?

याबाबत एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे सगळ्याच मातांना आपल्या मुलांची वाढ चांगली व्हावी आणि त्यांनी पोटभर खावं असं वाटत असतं. त्यामुळे अनेक माता आपल्या मुलांच्या तोंडात जेवण कोंबून कोंबून भरतात. त्यांना अनेक हाय कॅलरी फूड दिले जातात. जर मुलं एकाच जागी बसून राहत असतील, फिजिकल अॅक्टिविटी करत नसतील तर त्यांनी खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होणार नाही. हळूहळू ते चरबीच्या रूपात शरीरात जमा होतं. ज्यामुळे नंतर त्यांचं शरीर हळूहळू फुगतं आणि ते लठ्ठपणाचे शिकार होतात.

कसा कमी कराल त्यांचा लठ्ठपणा?

वेगवेगळे एक्सपर्ट लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगत असतात. पण ते सगळेच केले जातात असं नाही. मुलांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी पालकांनी सगळ्यात जास्त सतर्क राहणं गरजेचं असतं. त्यांच्या गरजा पूर्ण करा, त्यांचे लाड करा पण त्यांना काही हेल्दी सवयी सुद्धा लावा. बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी त्याना घरातील पौष्टिक पदार्थ द्या. जास्त गोड, तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ त्यांना देणं टाळता येईल. मोबाइल-टीव्ही बघण्यापेक्षा त्यांना बाहेर मित्रांसोबत खेळायला पाठवा. असं कराल तर त्यांच्या शरीरात जमा झालेली चरबी कमी होईल आणि स्लीम दिसू लागतील.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स