वजन कमी करायचं म्हटलं की सर्वातआधी अनेकजण आपल्या आहारातून भात पूर्णपणे बंद करतात. “भात खाल्ल्याने वजन वाढतं” ही समजूत इतकी पक्की झाली आहे की डाएट करताना भात हा कितीही आवडत असला तरीही तो शक्यतो टाळलाचं जातो. वजन वाढेल किंवा पोटाची ढेरी दिसेल तसेच जाडजूड मांड्या यामुळे आपण वेटलॉस करताना भात खायला नक्कोच्च म्हणतो. पण खरंच, भात खाल्ल्याने वजन वाढते का? की आपली भात खाण्याची पद्धत आणि योग्य तांदळाची निवड चुकीची ठरते ? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतात(Brown Rice vs White Rice which rice is better for weight loss).
बाजारांत अनेक प्रकारचे तांदूळ असतात त्यापैकीच, एकीकडे पॉलिश केलेला, दिसायला सुंदर पण पोषकतत्वे गमावलेला 'व्हाईट राईस', तर दुसरीकडे आरोग्याचा खजिना (weight loss friendly rice option) मानला जाणारा 'ब्राऊन राईस' पण या दोघांपैकी वेटलॉस करण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारच्या तांदुळाची निवड करावी हे समजत नाही. आजकाल व्हाईट राईस की ब्राऊन राईस ? वजन कमी करण्यासाठी नेमका कोणता पर्याय योग्य, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काहीजण ब्राऊन राईस अधिक हेल्दी मानतात, तर काहींना व्हाईट राईस पचायला हलका वाटतो. मग खरेच वजन नियंत्रणासाठी कोणता भात खाणं फायदेशीर? योग्य तांदुळाची निवड करून (healthy rice options for weight loss) वजन वाढू न देता आहार कसा संतुलित ठेवायचा ते पाहूयात...
ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये काय फरक आहे?
ब्राऊन राईस हा एक भरड धान्याचा प्रकार आहे. यात वरची पातळ साल (ब्रॅन) काढले जात नाहीत, ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तर व्हाईट राईस प्रोसेस करून तयार केला जातो, ज्यामध्ये ही बाहेरील सालं काढून टाकली जातात. त्यामुळे भात अधिक मऊ आणि लवकर शिजणारा होतो, पण त्यातील फायबर आणि काही पोषक घटक कमी होतात.
नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट....
पोटाची ढेरी-जाडजूड मांड्या- फुग्यासारखे गाल लवकर होतील गायब, फक्त ३ सोप्या गोष्टी रोज करा...
कॅलरीजचे प्रमाण :-
अनेकांना वाटतं की ब्राऊन राईसमध्ये कॅलरी खूप कमी असतात, पण प्रत्यक्षात तसं नाही. एक वाटी शिजलेल्या ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमधील कॅलरी जवळपास सारख्याच असतात. फरक मुख्यतः फायबरमध्ये असतो. ब्राऊन राईसमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही.
वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस कसा फायदेशीर ?
ब्राऊन राईस वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. हा भात हळूहळू पचतो, त्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय ब्राऊन राईस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासही मदत करतो.
जेव्हा ब्लड शुगर अचानक वाढते आणि लगेच कमी होते, तेव्हा पटकन भूक लागते. पण ब्राऊन राईस शरीराला हळूहळू ऊर्जा देतो, त्यामुळे अचानक भूक लागणे आणि क्रेविंग्स कमी होऊ शकतात. मात्र, फक्त ब्राऊन राईस खाल्ल्यानेच वजन कमी होत नाही. त्यासोबत योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
केस गळणं थांबून केस लागतील चमकायला, पाहा घरगुती जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर-लांबसडक केसांचं सिक्रेट...
व्हाईट राईस आरोग्यासाठी चांगला की वाईट ?
व्हाईट राईसला अनेकदा वजन वाढण्याचे मुख्य कारण मानले जाते. व्हाईट राईस लवकर पचतो आणि शरीराला लगेच इन्स्टंट एनर्जी देतो. अनेक आशियाई देशांमध्ये लोक रोज व्हाईट राईस खातात आणि तरीही फिट राहतात. यामागचे कारण म्हणजे भाताचे योग्य प्रमाण आणि अॅक्टिव्ह लाईफस्टाईल. जर तुम्ही व्हाईट राईस मर्यादित प्रमाणात, भाज्या, डाळ आणि प्रोटीनसोबत खात असाल, तर आपण डाएट करतानाही आहारात या व्हाईट राईसचा समावेश करू शकतो.
वेटलॉस करण्यासाठी कोणता तांदूळ निवडणं योग्य ?
जर तुम्हाला पटकन वजन कमी करायचे असेल, तर ब्राऊन राईस हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. मात्र, व्हाईट राईसही मर्यादित प्रमाणात खाऊन सोबतच हेल्दी लाइफस्टाइल, भरपूर भाज्या आणि प्रोटीनसोबत खाल्ल्यास चालू शकतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या भाताचा समावेश थोडीशी अदलाबदल करून आहारात समाविष्ट करणे अधिक योग्य ठरते. फक्त व्हाईट राईस सोडून ब्राऊन राईस खाल्ल्यानेच वजन कमी होते असे नाही; खरा फरक तुमच्या रोजच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे पडतो.
Web Summary : Choose wisely between brown and white rice for effective weight loss. Brown rice, rich in fiber, keeps you full longer. White rice, consumed in moderation with a balanced diet, also helps manage weight.
Web Summary : वजन घटाने के लिए ब्राउन और व्हाइट राइस में से सही विकल्प चुनें। फाइबर से भरपूर ब्राउन राइस पेट को लंबे समय तक भरा रखता है। संतुलित आहार के साथ सीमित मात्रा में व्हाइट राइस का सेवन भी वजन नियंत्रित करने में मदद करता है।