वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना अनेक जण सर्वात आधी खाण्यावर नियंत्रण ठेवू लागतात. मात्र डाएट म्हणजे उपाशी राहणे किंवा बेचव पदार्थ खाणे असे अजिबात नाही. विशेषतः सकाळचा नाश्ता पौष्टिक असणे खूप महत्त्वाचे असते. डाएटाींगसाठी नाश्ताच करणं काही जण बंद करतात. मात्र नाश्ता हा महत्त्वाचा भाग मानला जातो. (Breakfast is important.. Don't skip breakfast to lose weight, weight loss tips)योग्य नाश्ता केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते, वारंवार भूक लागत नाही आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे डाएट करतानाही चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ निवडणे गरजेचे असते.
स्प्राऊट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्ये हा डाएटसाठी उत्तम पर्याय मानला जातो. त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. स्प्राऊट्स खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते. मोड आलेली कडधान्ये कांदा, टोमॅटो घालून चविष्ट लागतात.
फळेही सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरतात. सफरचंद, पपई, केळी, डाळिंब किंवा मोसंबी यांसारखी फळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. त्यात फायबर असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. मात्र फक्त फळांवरच अवलंबून न राहता त्यासोबत इतर पौष्टिक पदार्थ घेणेही गरजेचे असते.
रव्यापासून बनणारे पदार्थही योग्य प्रमाणात खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकतात. रवा हलका असतो आणि त्यामध्ये भाज्या घालून तयार केलेले पदार्थ अधिक पौष्टिक होतात. त्याचप्रमाणे ओट्स हे ही डाएटमध्ये लोकप्रिय मानले जातात. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
दही हा नाश्त्यातील आणखी एक चांगला पर्याय आहे. दही पचनासाठी उपयुक्त मानले जाते आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करते. काही लोक दह्यासोबत फळे किंवा ड्रायफ्रूट्सही खातात. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड आणि मनुका यांचा मर्यादित प्रमाणात समावेश केल्यास शरीराला चांगले फॅट्स आणि ऊर्जा मिळू शकते. दही घालून केलेले सॅलेड नाश्त्यासाठी उत्तम आहे.
डाएट करताना नाश्ता चवदार आणि संतुलित असणे महत्त्वाचे आहे. खूप तेलकट, जास्त साखर असलेले किंवा मैद्याचे पदार्थ टाळून नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ निवडल्यास वजन नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होऊ शकते. योग्य नाश्ता केल्याने शरीर दिवसभर अधिक ताजेतवाने आणि सक्रिय राहण्यास मदत होते.
Web Summary : Don't skip breakfast when dieting. Sprouts, fruits, and yogurt are good options. Include fiber-rich foods like oats and avoid oily or sugary items for successful weight management and sustained energy.
Web Summary : डाइटिंग करते समय नाश्ता न छोड़ें। स्प्राउट्स, फल और दही अच्छे विकल्प हैं। ओट्स जैसे फाइबर युक्त खाद्य पदार्थ शामिल करें और सफल वजन प्रबंधन और निरंतर ऊर्जा के लिए तैलीय या शर्करा युक्त वस्तुओं से बचें।