Join us  

Black fungus prevention : ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 9:57 AM

Mucormycosis The black fungus : तेलात तळलेले खाद्यपदार्थ देखील ब्लॅक फंगसला प्रोत्साहित करतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोविडमधून बरे व्हाल तेव्हा पूर्णपणे आरामशीर राहू नका आणि असे समजू नका की आता आपण काहीही खाण्यास मोकळे आहात.

ठळक मुद्देफळे आरोग्यासाठी पूर्णपणे फायदेशीर असतात. थंड फळे ब्लॅक फंगसच्या रूग्णाला धोकादायक ठरू शकतात.आपल्याला प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यासारखे आवश्यक पोषक पदार्थ मिळत नाहीत. तसेच, स्वच्छता, ते कसे शिजवले गेले याबद्दल काही माहिती नाही. म्हणून फक्त घरी शिजवलेले अन्न खा. 

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी होऊ लागला आहे, परंतु आता ब्लॅक फंगस लोकांना वेगाने पसरत आहे. बुरशीजन्य संसर्ग हा एक नवीन आजार नाही, परंतु कोविडपासून बरे होणारे लोक लवकरच या आजाराच्या अधीन येत आहेत. ब्लॅक फंगस कोविड रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे लोक डोळे गमावू शकतात. आरोग्य तज्ञ स्टिरॉइड्स आणि मधुमेह याला मुख्य कारण म्हणून देत आहेत. डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की जर आपण त्यातील लक्षणे वेळेत ओळखली तर उपचार केले जाऊ शकतात.

ब्लॅक फंगसच्या औषधांव्यतिरिक्त आपण आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक फंगसचा संसर्ग टाळायचा असल्यास आपल्याला या दिवसात काही गोष्टी टाळाव्या लागतील. अलीकडेच आयुर्वेदिक डॉक्टरांनी लोकांना हे टाळण्यासाठी काही खबरदारी घ्यायला सांगितली आहे. काळ्या बुरशीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींपासून दूर रहावं लागले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 

बंगळुरुच्या जीवनोत्तमा आयुर्वेद केंद्राच्या वैद्य डॉ. शरद कुलकर्णी  M.S (Ayu), (Ph.D.) यांनी म्यूकोरमायकोसिस ग्रस्त लोकांना 6 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की जर त्यांनी या गोष्टी सतत सुरू ठेवल्या तर शरीरात काळ्या बुरशीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत जातो आणि त्यानंतर रुग्णाला त्याचे तीव्र लक्षणांचा सामना करावा लागतो. म्हणूनच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

थंड पदार्थांचे सेवन करू नका

डॉ. कुलकर्णी यांचा असा विश्वास आहे की कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर ब्लॅक फंगस होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी थंड पदार्थ खाऊ नये. या साथीच्या संसर्गाच्या दरम्यान, त्यांनी थंड पाणी किंवा फ्रीजमधून काढलेली कोणतीही थंड वस्तू खाऊ नये. असे सांगितले आहे,  थंड फळंही नुकसान पोहोचवू शकतात.

तळलेले पदार्थ

तेलात तळलेले खाद्यपदार्थ देखील ब्लॅक फंगसला प्रोत्साहित करतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोविडमधून बरे व्हाल तेव्हा पूर्णपणे आरामशीर राहू नका आणि असे समजू नका की आता आपण काहीही खाण्यास मोकळे आहात. रिकव्हर कालावधीत आपण आपले खाणे-पिणे सोपे ठेवले तर चांगले होईल. ब्रेड, समोसा, भजिया आणि पराठा असे तळलेले पदार्थ खाणे टाळा. उच्च चरबी आणि कॅलरी व्यतिरिक्त, मीठ आणि साखर तळलेल्या अन्नातदेखील जास्त आढळते.

बाहेरचं खाऊ नका

आयुर्वेदिक वैद्य म्हणतात की बाहेरून मागविलेले जेवणदेखील हानिकारक असू शकते. कारण यामध्ये आपल्याला प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यासारखे आवश्यक पोषक पदार्थ मिळत नाहीत. तसेच, स्वच्छता, ते कसे शिजवले गेले याबद्दल काही माहिती नाही. म्हणून फक्त घरी शिजवलेले अन्न खा. 

फळं धुवून खा

फळे आरोग्यासाठी पूर्णपणे फायदेशीर असतात. थंड फळे ब्लॅक फंगसच्या रूग्णाला धोकादायक ठरू शकतात. गरम पाण्याने धुतल्यानंतर त्यांना खाणे चांगले होईल. म्हणून नेहमीच फळं धुतल्यानंतरच त्याचे सेवन करा.

शिळं अन्न

बरेचदा आपण पाहतो की काही लोक बर्‍याच काळासाठी ठेवलेल्या अन्नाचे सेवन करतात परंतु हे योग्य नाही. डॉक्टरांच्या मते  बराच काळ ठेवलेला आहार आरोग्यासाठी चांगला नाही. म्हणून लक्षात ठेवा नेहमीच ताजे अन्न खा. या पौष्टिक द्रव्यांचा अधिक भाग घेण्यासाठी बरेच लोक डाईडमध्ये कच्चे अन्नही घेतात. त्यांचे मत आहे की स्वयंपाक किंवा उकळलेले अन्न त्यामध्ये असलेल्या आवश्यक घटकांचा नाश करते, परंतु सध्याच्या स्थितीत असे कच्चे अन्न हानिकारक ठरू शकते.

साखरेचं कमी प्रमाणात सेवन करा

म्यूकोरमायकोसिसमध्ये साखरेचं अतिसेवन करणं आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकतं. साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात काळ्या बुरशीची वाढ अधिक होते. म्हणून, सध्या साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करणे थांबवा.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सम्युकोरमायकोसिसअन्नतज्ज्ञांचा सल्ला