How To Drink Black Coffee For Weight Loss : ब्लॅक कॉफी सामान्यपणे फ्रेश वाटण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी प्यायली जाते. इतकंच नाही तर ब्लॅक कॉफीच्या मदतीनं शरीरातील चरबी वेगानं बर्न करण्यासही मदत मिळते. ब्लॅक कॉफी आपला मेटाबॉलिझम बूस्ट करू शकते आणि आपल्याला फिट ठेवण्यास मदत करू शकते. पण थांबा…यात एक महत्वाचा मुद्दा आहे. याचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्याल. डाएटिशियन तमन्ना दयाल यांच्याकडून जाणून घेऊया की ही साधी दिसणारी ब्लॅक कॉफी शरीरात नेमकी कशी काम करते.
ब्लॅक कॉफी वजन कमी कशी करते?
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असतं. हे घटक शरीरातील ग्लुकोजचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे फॅट बर्निंगची गती वाढते आणि चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्लॅक कॉफी लिव्हरला सक्रिय करते. लिव्हर जसे-जसे सक्रिय होते, तसतसा मेटाबॉलिझम आपोआप वाढतो. तसेच ती शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या वेट लॉस जर्नीला गती मिळते.
ब्लॅक कॉफी कुणी आणि कधी प्यावी?
ब्लॅक कॉफी सर्वांसाठी योग्य नसते. पिण्यापूर्वी आपल्या शरीराचा स्वभाव समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांना अॅसिडिटीची समस्या असते त्यांनी ब्लॅक कॉफी टाळावी, कारण ती अॅसिडिटी वाढवू शकते. जर शरीराचा pH अल्कलाइन असेल, तर सकाळी उपाशीपोटी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. यामुळे एनर्जी लेव्हल वाढते आणि त्यानंतर वर्कआउट किंवा इतर शारीरिक क्रिया सहज करता येतात.
वय आणि प्रमाण याची विशेष काळजी घ्या
ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे, पण जास्त प्रमाणाक चांगली नसते. वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि दिवसात 6–7 कप ब्लॅक कॉफी घेत असाल, तर तुम्हाला ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका होऊ शकतो.
योग्य प्रमाण
दिवसात 3 ते 4 कप ब्लॅक कॉफी पुरेशी आहे. इतके प्रमाण फॅट मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी योग्य मानले जाते. रात्री ब्लॅक कॉफी पिण्याची चूक करू नका. अनेकांना वाटते की रात्री ब्लॅक कॉफी प्यायल्याने झोपताना फॅट बर्न होईल. पण असे अजिबात होत नाही. ब्लॅक कॉफी रात्री प्यायल्याने वजन कमी होत नाही. उलट झोपेचा दर्जा खराब होतो. शरीर अस्वस्थ राहू शकतं. म्हणून झोपण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिणे टाळा.
योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात घेतलेली ब्लॅक कॉफी तुमचा मेटाबॉलिझम आणि एनर्जी लेव्हल वाढवून वजन कमी करण्यात नक्की मदत करू शकते.
