Join us

अपचनाचा त्रास- पोट गुबारून जातं? 'या' पद्धतीने वेलची,ओवा खा- ॲसिडीटी, अपचन होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 13:05 IST

Best Remedies For Reducing Problems Like Bloating, Acidity And Indigestion: अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात.(how to get rid of bloating, acidity and indigestion?)

ठळक मुद्देहा उपाय नियमितपणे केल्यास अपचन, ॲसिडीटी असा त्रास होणार नाही. शिवाय चयापचय क्रियाही अधिक उत्तम होईल. 

काही जणांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो. खाण्यापिण्यात थोडा काही बदल झाला किंवा थोडं जास्त खाण्यात आलं, जेवणाच्या वेळांमध्ये बदल झाला तर लगेचच अपचन होणे, पाेट फुगणे किंवा पोट गुबारल्यासारखे होणे असा त्रास होऊ लागतो. हा त्रास वारंवार होणं खूपच त्रासदायक आहे. म्हणूनच तो कमी करण्यासाठी आता हे दोन अगदी सोपे उपाय करून पाहा (home remedies). हे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर फक्त १५ दिवसांतच तुम्हाला नेहमीच होणारा हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत.(how to get rid of bloating, acidity and indigestion?)

 

अपचन, पोट गुबारण्याचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

पचनासंबंधी कोणताही त्रास असल्यास सोपा घरगुती उपाय करून तो त्रास कसा कमी करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ तज्ज्ञांनी karankakkad_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेले दोन उपाय पुढीलप्रमाणे...

स्लायडिंग विंडो ट्रॅकसह घरातला कानाकोपरा स्वच्छ करणारा ब्रश- १४० रुपयांत सगळं घर होईल चकाचक.. 

१. वेलची

डॉक्टर सांगतात की दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनी एक वेलची बारीक चावून खावी. पचन चांगले होण्यासाठी वेलची अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटण्याचा, पोट गुबारून जाण्याचा त्रास लगेचच कमी होतो.

 

२. ओवा आणि काळे मीठ

आपल्याला माहितीच आहे पचन व्यवस्थित होण्यासाठी ओवा अतिशय उपयुक्त ठरतो. पण तो जर तुम्ही काळ्या मीठासोबत खाल्ला तर त्याचा अधिक चांगला परिणाम पचनक्रियेवर होतो.

अंथरुणावर पडूनही बराच वेळ झोप येत नाही? बघा ३-२-१ चा नियम, चटकन शांत झोप लागेल

हा उपाय कसा करावा ते पाहूया. दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर हातावर १ टीस्पून ओवा घ्या. त्यामध्ये चिमूटभर काळेमीठ घाला. हे दोन्ही पदार्थ थोडेसे चावून ग्लासभर पाण्यासोबत गिळून टाका. हा उपाय नियमितपणे केल्यास अपचन, ॲसिडीटी असा त्रास होणार नाही. शिवाय चयापचय क्रियाही अधिक उत्तम होईल. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी