Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > High Protein Veg Food : शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय

High Protein Veg Food : शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय

Best Food Combinations to Reduce Protein Deficiency: शाकाहारी लोकांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी पुढे सांगितलेले काही फूड कॉम्बिनेशन्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.(how to get rid of protein deficiency?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 18:28 IST2026-01-22T17:43:33+5:302026-01-22T18:28:43+5:30

Best Food Combinations to Reduce Protein Deficiency: शाकाहारी लोकांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी पुढे सांगितलेले काही फूड कॉम्बिनेशन्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.(how to get rid of protein deficiency?)

best food combinations to reduce protein deficiency, how to get rid of protein deficiency, best veg superfood for protein deficiency  | High Protein Veg Food : शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय

High Protein Veg Food : शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय

Highlightsते पदार्थ नेमके कोणते आणि ते कशा पद्धतीने खायला हवे?

बहुतांश शाकाहारी लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रामुख्याने दिसून येणारी एक तक्रार म्हणजे या लोकांच्या शरीरात प्रोटीन्स खूप कमी प्रमाणात असतात. शाकाहारी पदार्थांमधून पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत, असा त्यांचा समज असतो. पण काही डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ मात्र असं सांगतात की तुम्ही काही पदार्थ जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्यातून तुमच्या शरीराची प्रोटीन्स गरज निश्चितच भागू शकते (how to get rid of protein deficiency?). ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कशा पद्धतीने खायला हवे ते पाहा..(best food combinations to reduce protein deficiency) 

शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन्स देणारे फूड कॉम्बिनेशन्स

 

१. उडीद डाळ आणि तांदूळ हे प्रोटीन्ससाठी एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे इडली सांबार असा मेन्यू करून तुम्ही खाल्ला तर त्यातून चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स मिळतात.

लग्न ठरताच प्रत्येक नवरीने खायला हवे ‘हे’ पदार्थ, ८ दिवसांत येईल चेहऱ्यावर तेज, ब्रायडल फेशियलची गरज नाही

२. मूग डाळ आणि बाजरी ही दोन धान्यं एकत्र करून खाल्ल्यानेही त्यातून चांगले प्रोटीन्स मिळतात. मुगाचं वरण आणि बाजरीची भाकरी असा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यातून लायसिन आणि मेथीओनाईन हे प्रोटीन्स मिळतात. ते पचायलाही हलके असतात.

३. हरबऱ्याची डाळ आणि गव्हाची पोळी हे देखील एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. यातून शरीराला गरजेचे असणारे जवळपास सगळेच अमिनो ॲसिड्स मिळतात.

 

४. वरण भात हा देखील प्रोटीन्ससाठी एक चांगला पर्याय आहे. डाळ आणि भात यांचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर त्यातूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.

५. राजमा चावल हा देखील एक मस्त पर्याय आहे. त्यातून प्रोटीन्स तर मिळतातच, पण त्यासोबतच लोह आणि फायबरही पुरेशा प्रमाणात मिळतं.

शुटींगमध्ये असताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

६. मसूर डाळ आणि गव्हाची पोळी हे कॉम्बिनेशनही शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आहे. शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींनाही ते चालू शकतं.

७. खिचडी हा देखील प्रोटीन्सचा सुपर स्त्रोत आहे, असं डॉक्टर सांगतात. भाज्या आणि तूप घालून तुम्ही खिचडीला आणखी पौष्टिक करू शकता. ही सगळी माहिती अभ्यासकांनी yogawithengineer या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.


 

Web Title : प्रोटीन का खजाना: शाकाहारी शक्ति के लिए इन अनाजों को मिलाएं।

Web Summary : अक्सर शाकाहारियों में प्रोटीन की कमी होती है, लेकिन अनाज का संयोजन मदद कर सकता है। उड़द दाल चावल (इडली सांभर) के साथ, मूंग दाल बाजरा के साथ, और चना दाल गेहूं के साथ आवश्यक अमीनो एसिड प्रदान करते हैं। दाल-चावल, राजमा-चावल और खिचड़ी भी अच्छे विकल्प हैं।

Web Title : Unlock protein power: Combine these grains for vegetarian strength.

Web Summary : Vegetarians often lack protein, but combining grains can help. Urad dal with rice (Idli sambar), moong dal with bajra, and chana dal with wheat provide essential amino acids. Dal-rice, rajma-rice, masoor dal with wheat and khichdi are also good options.