आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ असतात जे खूप उपयुक्त आहेत हे आपल्याला माहिती असतं, पण तरीही आपण ते खूपच कमी प्रमाणात खातो. असाच एक पदार्थ म्हणजे रताळी. रताळी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत, हे आपण जाणतो. पण तरीही उपवासाचा दिवस वगळता अन्य दिवशी आपण कधीही रताळी खात नाही. काही जण तर उपवासालाही रताळी खात नाहीत. खूपच कमी लोक असे असतील जे बाजारातून इतर भाज्यांसोबत अगदी आवर्जून रताळे घेऊन येतात. म्हणूनच रताळे खाण्याचे हे काही फायदे बघा आणि नियमितपणे रताळे खाण्यास सुरुवात करा..(benefits of eating sweet potato)
हेल्थ लाईन यांनी दिलेल्या माहितीनुसार रताळ्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि काही ॲण्टी कॅन्सर घटकही आढळून येतात. रताळ्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे एजिंग प्रक्रिया हळूवार करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.
ट्रम्पच्या डिनर पार्टीत नीता अंबानींच्या 'या' साडीची प्रचंड चर्चा, साडी विणायला लागले १९०० तास...
शिवाय रताळ्यामध्ये असे काही घटक असतात जे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात. रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही रताळे खाणे उपयुक्त ठरते. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती तसेच लहान बालकांसाठीही उकडलेले रताळे पोषक ठरतात.
रताळ्यांमधून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात मिळते. हल्ली स्क्रिन टाईम वाढल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
किचनमध्ये खूपच पसारा होतो? २५० रुपयांत घ्या 'या' वस्तू, किचन नेहमीच दिसेल टापटीप
त्यामुळेच डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणारे रताळे शक्य होईल तेवढे खायलाच हवेत, असंही तज्ज्ञ सांगतात. रताळे जेवढे गुणकारी असतात, तेवढेच गुणकारी त्यांचे सालसुद्धा असते. कारण त्यांच्यामध्ये पचनासाठी मदत करणारे अनेक घटक असतात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी रताळी सालींसकट खाणे खूप फायदेशीर ठरते.