आपल्याकडे जेवण झाल्यानंतर कित्येक लोकांना बडिशेप खाण्याची सवय असते. पुर्वी तर पानाचा विडा घरोघरी केला जायचा आणि जेवण झाल्यानंतर वयस्कर मंडळी आवर्जून पान खायची. पण आता मात्र वेळेमुळे किंवा फारशी आवड नसल्याने रोज विडा खाल्ला जात नाही. पण बडिशेप मात्र काही लोक अगदी नेमाने खातात. काही जणांना तर बडिशेप एवढी आवडते की जेवण झाल्यानंतर तर ते खातातच पण एरवीही चहा- कॉफी घेतल्यानंतर किंवा उगाच आवडते म्हणूनही खातात. बरेच जण बडिशेपेसोबत खडीसाखरही खातात (benefits of eating raw sugar or mishri after meal). तुम्हीही बडिशेप प्रेमी असाल तर जेवण झाल्यानंतर बडिशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो ते पाहा..(why it is important to eat rock sugar and fennel seeds after meal?)
जेवणानंतर बडिशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीरावर होणारे परिणाम...
बडिशेपमध्ये ॲनाथॉल नावाचं एक तेल असतं. हे तेल आपल्या आतड्यांना रिलॅक्स करतं. अन्नपचन होण्यासाठी खूप मदत करतं. यामुळे अपचन, ॲसिडीटी किंवा पचनाशी संबंधित इतर त्रास होत नाहीत. अन्नपचन व्यवस्थित होतं. बरेचदा आपल्या जेवणात तिखट, तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात असतात.
फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक किती तासांत खराब होते? तुम्हीही फ्रिजमध्ये कणिक ठेवत असाल तर.....
असं हेवी जेवण झाल्यानंतर कित्येकांना ॲसिडीटीचा त्रास होतो. म्हणून अशावेळी जेवण झाल्यानंतर नुसती बडिशेप खाण्यापेक्षा बडिशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाणे जास्त फायदेशीर होते. कारण खडीसाखर थंड असल्याने ती पोटातला दाह कमी करण्यास मदत करते.
खडीसाखर आणि बडिशेप एकत्र करून खाल्ल्याने शरीरातले रक्ताभिसरणही जास्त चांगले होते. याचा लाभ सगळ्याच अवयवांना होतो. त्यामुळे जेवणानंतर थोडी का होईना पण बडिशेप खायला हवी आणि त्याच्या जोडीला खडीसाखर घ्यावी.
लहान मुलांचेही केस खूप गळू लागले? जावेद हबीब सांगतात मुलांच्या नाजुक केसांसाठी सोपा उपाय
खडीसाखरेच्या ऐवजी साधी साखर खाऊ नये. किंवा बाजारात जी एकसारखा आकार असणारी प्रोसेस केलेली खडीसाखर असते ती न खाता ओबडधोबड आकारात मिळणारी एकदम रॉ स्वरुपातली साखर खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
