Join us

डॉक्टर सांगतात बेदाणे खाण्याच्या २ योग्य पद्धती! हिमाेग्लोबिन वाढेल, कित्येक आजार होतील छुमंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 15:34 IST

Benefits Of Eating Manukka Or Bedane: बेदाणे खाण्याच्या योग्य पद्धती कोणत्या आणि त्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, याविषयीची माहिती...(Amazing health Benefits of eating Dry Grapes )

ठळक मुद्दे बेदाणे योग्य पद्धतीने जर नियमितपणे खाल्ले तर ॲसिडीटी, बद्धकोष्ठता असे त्रासही कमी होतात.

अनेक आजारांवरचे रामबाण उपाय आपल्या स्वयंपाक घरातच आहेत, पण आपलं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे बेदाणे. सुकामेव्यातले बेदाणे बहुतांश घरांमध्ये फक्त खीर, शीरा, हलवा अशा गोड पदार्थांमध्ये घालण्यासाठीच वापरले जातात. पण ते जर तुम्ही रोज खाल्ले तर तुमचे कित्येक आजार बरे होऊ शकतात. त्यासाठी बेदाणे नेमके कशा पद्धतीने खावे जेणेकरून त्याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो, हे पाहणेही गरजेचेच आहे (benefits of eating manukka or bedane). म्हणूनच पाहा त्याविषयी डॉक्टरांनी दिलेली खास माहिती..(Amazing health Benefits of eating Dry Grapes )

 

बेदाणे खाण्याचे फायदे

बेदाणे खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.sharmarobin या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

१. बेदाण्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात.

२. बेदाण्यांमधून ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ॲण्टीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात.

केस इंचभर वाढायलाही महिनोंमहिने लागतात? जास्वंदाचा 'हा' उपाय करा- लांबसडक दाट होतील..

३. बेदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ॲनिमिया किंवा हिमोग्लाेबिनचा त्रास असणाऱ्यांसाठीही ते उपयुक्त ठरतात.

४. बेदाणे योग्य पद्धतीने जर नियमितपणे खाल्ले तर ॲसिडीटी, बद्धकोष्ठता असे त्रासही कमी होतात.

५. आजारपणानंतर आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठीही बेदाणे खाणे फायद्याचे ठरते. 

६. खोकला, कफ हा त्रास कमी करण्यासाठीही बेदाण्यांची मदत होते. 

 

बेदाणे खाण्याची योग्य पद्धत

१. बेदाण्यांमधील गुणधर्मांचा शरीराला जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी ते योग्य पद्धतीने कसे खावे, याविषयी डॉक्टर सांगतात की सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे दररोज रात्री झोपताना १ चमचाभर बेदाणे आणि अर्धा चमचा बडिशेप ग्लासभर पाण्यात भिजत घाला.

मे महिन्यात कुंडीत लावा ‘ही’ रोपं, वर्षभर रंगबिरंगी फुलांनी बहरुन जाईल तुमची गॅलरी!

सकाळी बडिशेप आणि बेदाणे बारीक चावून खा आणि पाणी पिऊन टाका. यामुळे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा असे त्रास कमी होतात.

२. जर लहान मुलांना खूप खोकला येत असेल तर बेदाणे आणि खडीसाखर एकत्र करून ती मुलांना खायला द्या. यामुळे खोकला तर कमी होईलच पण अंगातली ताकद वाढून अशक्तपणाही कमी होईल. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग