Join us

रिमझिम पावसात गरमागरम भुट्टा तर खायलाच हवा! मक्याचे कणीस खाण्याचे ५ जबरदस्त फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 16:27 IST

Health Benefits Of Eating Sweet Corn: रिमझिम पाऊस पडू लागला की मक्याच्या कणसाची आठवण हमखास येतेच. आठवण आली की लगेचच मक्याचे कणीस खा, कारण... 

ठळक मुद्देमक्याचं कणिस जर उकडून खाल्लं तर पोटासाठी खूप दमदार होतं. ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.

प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते.. आता पावसाळा सुरू आहे तर त्यामध्येही एक वेगळाच आनंद आहे. पावसाळी पर्यटन म्हणजे या दिवसांतले सगळ्यात मोठे आकर्षण. काही प्रसिद्ध ठिकाणं आहेतच की त्याठिकाणी पावसाळ्यात भेट द्यायलाच हवी. पण त्यासोबतच या दिवसांत वातावरण एवढे बदलून गेलेले असते की प्रत्येक शहराच्या आसपासचा निसर्गही अगदी हिरवागार होऊन जातो. हा हिरवागार निसर्ग पाहायला मग आपसूकच आसपासचे लोक तिथे येतात आणि एरवी ओसाड पडलेल्या त्या ठिकाणाला पावसाळ्यात एकदम पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून जातो. अशा छोट्यामोठ्या ठिकाणी गर्दी होऊ लागली की तिथे आपोआपच काही खाद्यपदार्थ विक्रेतेही येतातच. त्यामध्ये पावसाळ्यात सगळ्यात अग्रणी असतात ते गरमागरम भुट्टा किंवा मक्याचे कणीस विकणारे.. या गाड्यावर या दिवसांत खूप गर्दी असते (benefits of eating bhutta or corn in monsoon). कारण रिमझिमणाऱ्या पावसात मका खाण्याचा आनंद काही वेगळाच.(health benefits of eating sweet corn)

 

मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मक्याचे कणीस तुम्ही भाजलेले खा किंवा मग उकडलेले खा, ते छानच लागते. हे कणीस फक्त रसनातृप्ती करतं असं नाही, तर ते आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी ठरतं. ते खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात ते पाहूया.. 

डिमेंशिया, अर्थरायटीसचं प्रमाण वाढतंय! तज्ज्ञ सांगतात हे आजार टाळण्याचा १ खास उपाय

१. मक्याच्या कणसामधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं तर व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन सी त्वचेसाठीही अतिशय उत्तम असतं.

 

२. व्हिटॅमिन ए प्रमाणेच बीटा कॅरोटीनही मक्याच्या कणसामध्ये चांगल्या प्रमाणात असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं असतं. त्यामुळेच मक्याचं कणीस या दिवसात मुलांनाही खायला द्यावं.

दूध प्यायला आवडत नाही? हाडं दणकट ठेवणारे ६ शाकाहारी पदार्थ खा- भरपूर कॅल्शियम मिळेल...

३. मक्याचं कणिस जर उकडून खाल्लं तर पोटासाठी खूप दमदार होतं. ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठीही ते फायदेशीर ठरतं.

४. फायबर आणि व्हिटॅमिन्स भरपूर असल्याने मक्याचे कणीस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगाअन्नमोसमी पाऊस