वाढतं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न पडला असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने तुमच्या पचनाशी तसेच मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रियेशी संबंधित असणाऱ्या कित्येक समस्या कमी होतील. पचन आणि मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं तर आपोआपच वजन कमी होण्यास मदत होते. हा उपाय नेमका कसा करायचा आणि त्याने नेमके काय फायदे होतात ते पाहूया...(how to use cinnamon for weight loss?)
वजन कमी करण्यासाठी रात्री प्या हा काढा..
हा काढा तयार कसा करायचा आणि त्याने आरोग्याला काय फायदे होतात, याची माहिती डॉक्टरांनी mehtatarjun97 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ कप गरम पाणी घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला.
गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..
आता याच मिश्रणामध्ये १ टीस्पून दालचिनीची पावडर आणि १ टीस्पून मध घालावा. सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि ते गरम असतानाच प्या. काही दिवस तरी नियमितपणे हा उपाय करून पाहा. शरीराला निश्चितच फायदे होऊन वजन कमी झाल्याचं जाणवेल असं डॉक्टर सांगतात.
मध, लिंबू आणि दालचिनीचा काढा पिण्याचे फायदे
१. हा उपाय केल्याने सकाळी उठताच तुम्हाला खूप हलकं, फ्रेश वाटेल. अंगातला जडपणा कमी झाल्यासारखा जाणवेल.
२. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की त्यांचा चेहरा सुजलेला दिसतो. डोळ्यांच्या खालच्या भागात सूज आल्यासारखी वाटते. ही चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो.
तुम्ही तुमच्या मुलांशी ‘या’ विषयावर बोललात का? मूल १८ वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांना सांगा ६ गोष्टी
३. रात्री झोपण्यापुर्वी हा काढा प्यायल्यास आपल्या शरीरात नॅचरल डिटॉक्स सुरू होतं. त्यामुळे शरीरातलं अतिरिक्त पाणी, टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्याची क्रिया सुरू होते. यामुळेही शरीरावरची सूज कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
४. मेटाबॉलिझम चांगलं होतं. त्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट्स साचून राहण्यापेक्षा जे जास्तीचे फॅट्स आहेत ते बर्नआऊट होण्याची प्रक्रिया सुरू होते.
५. पचनक्रियाही चांगली होते. त्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते...
