Join us

स्ट्रेस की जास्त खाणं...पोटाचा आकारच सांगतो चरबी वाढण्याचं कारण, करा हे योग्य उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:55 IST

Belly Fat Causes : आज आम्ही तुम्हाला पोटावर चरबी वाढण्याची किंवा पोट बाहेर येण्याची इतरही काही कारणं सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही योग्य ते उपाय करू शकाल.

Belly Fat Causes : पोटावर, कंबरेवर, मांड्यावर, दंडांवर चरबी वाढणं कुणालाही आवडत नसतं. कारण यामुळे शरीर एकतर बेढब दिसतं, सोबतच आत्मविश्वासही कमी होतो. रोज कामं करण्यातही यामुळे अडचण होते. आजकाल पोटावर वाढलेल्या चरबीमुळे जास्तीत जास्त लोक चिंतेत असतात. मुळात पोटावर चरबी वाढण्याची कारणं वेगवेगळी असतात. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त लाइफस्टाईल ही याची दोन मुख्य कारणं सांगितली जातात. अशात आज आम्ही तुम्हाला पोटावर चरबी वाढण्याची किंवा पोट बाहेर येण्याची इतरही काही कारणं सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही योग्य ते उपाय करू शकाल.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शरीराची हालचाल न करणे या कारणांमुळे तर पोटवर चरबी वाढतेच, सोबतच स्ट्रेस आणि हार्मोनमध्ये असंतुलन या गोष्टीही यासाठी कारणीभूत असतात. महत्वाची बाब म्हणजे तुमच्या पोटाचा आकार बघून तुम्ही पोटावर चरबी वाढण्याच्या कारणाबाबत जाणून घेऊ शकता. 

तुमच्या पोटावर चरबी कोणत्या कारणाने वाढली याचं जर योग्य कारण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही योग्य तो उपाय करू शकता. म्हणजे जर खाण्या-पिण्यामुळे असं झालं असेल तर ते कमी करू शकता. जर स्ट्रेसमुळे पोट बाहेर आलं असेल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी आवश्यक ते करू शकता. चला तर जाणून घेऊ पोटाचा शेप चरबी वाढण्याच्या कारणाचा कसा खुलासा करतो.

शरीराच्या वरच्या भागात चरबी

जर पोटासोबतच शरीराच्या वरच्या भागात चरबी वाढली असेल तर याचं कारण ओव्हरईटिंग आणि शुगर जास्त असलेल्या गोष्टी खाणं असू शकतं. अशात चरबी कमी करण्यासाठी जास्त खाणं टाळावं, जंक फूड टाळावेत आणि नियमितपणे व्यायाम करावा.

पोटाच्या खालच्या भागात चरबी

जर तुमच्या पोटाच्या खालच्या भागात चरबी जमी झाली असेल तर याचं कारण स्ट्रेस, डिप्रेशन किंवा एंझायटी असू शकतात. नेहमीच फार जास्त तणावात राहिल्यानं पोटाच्या खालच्या भागात चरबी जमा होते. अशात स्ट्रेस कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजे.

मोठं पोट

जर पोट मोठं गोलमटोल झालं असेल तर याचं कारण शरीराची हालचाल अजिबात न करणं असू शकतं. जे लोक सुस्त असतात, एकाच जागी बसून राहतात अशा लोकांचं पोटावर अधिक चरबी दिसते.

सूजलेलं पोट

जर तुमचं पोट सूजलेलं दिसत असेल तर याचं कारण जास्त दारू पिणं किंवा श्वास घेण्यास समस्या असू शकतं.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स