Weight Loss Drink : तुम्ही पाहिलं असेल तर वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा एक्सपर्ट वेगवेगळ्या ड्रिंक्सबाबत सांगतात. कारण वजन कमी करण्यासाठी केवळ एक्सरसाईज किंवा डायटिंगच नाही तर हे वेगवेगळे नॅचरल ड्रिंक्सही खूप फायदेशीर ठरतात. लिंबू पाणी, हळदीचं पाणी, आल्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीचं पाणी, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस यांचा यात प्रामुख्यानं समावेश होतो. तुम्ही सुद्धा शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एखाद्या अशाच नॅचरल आणि प्रभावी ड्रिंकच्या शोधात असाल तर एका ड्रिंकबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे ड्रिंक वजन कमी करण्यासोबतच पचन तंत्र सुधारतं, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर काढतं.
चरबी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी जे ड्रिंक एक्सपर्ट सजेस्ट करतात ते आहे बेलफळाचं सरबत. उन्हाळ्यात बेलफळाचं सरबत भरपूर प्यायलं जातं. कारण यानं शरीर आतून थंड राहतं. सोबतच पचन तंत्र मजबूत राहतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे नॅचरल आंबट-गोड सरबत शरीरात वाढलेली चरबी सुद्धा कमी करतं. ज्यामुळे तुमचं वजन कमी होतं. यात फायबर, व्हिटामिन्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे शरीरात भरपूर फायदे देतात. अशात बेलफळाच्या सरबताचे फायदे काय होतात हे जाणून घेऊ.
वजन कमी करतं
पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासोबतच बेलफळाचं सरबत वजन कमी करण्यासही मदत करतं. या सरबतानं शरीरात वाढलेली चरबी कमी होते. कारण यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील कॅलरी जळण्याचं काम वेगानं होतं. तसेच यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे जास्तीचं खाणंही टाळलं जातं.
पचनक्रिया सुधारते
बेलफळामध्ये असे काही नॅचरल गुण असतात जे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास हे गुण मदत करतात. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे आतड्या साफ राहतात आणि पचनक्रिया आणखी चांगली होते.
बॉडी डिटॉक्स
बेलफळाच्या सरबतानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडून शरीर आतून साफ राहतं. हे सरबत जर नियमितपणे प्याल तर शरीरात जमा विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचा आणखी चमकदार आणि फ्रेश दिसते. शरीर हलकं वाटतं.
पोटातील सूज होईल कमी
वेगवेगळ्या कारणांनी पोटात आलेली सूज कमी करण्यासाठी सुद्धा बेलफळ फायदेशीर ठरतं. यातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण पोटाच्या आतील सूज कमी करतात आणि पचन तंत्र मजबूत ठेवतात. या सरबताचं पोटाला थंडावा मिळतो आणि पोट शांत राहतं.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
बेलफळाचं सरबत केवळ पोटासाठी आणि वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर नाही तर केस व त्वचेसाठीही गुणकारी ठरतं. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन सी मुळे त्वचेची चमक वाढते. तसेच केस मजबूत होतात.