Join us

पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरते 'ही' पावडर, डॉक्टर म्हणतात १५ दिवसात दिसेल फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:26 IST

Ayurvedic Powder for Weight Loss: बरेच एक्सपर्ट पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपायही सांगतात. असाच एक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Ayurvedic Powder for Weight Loss: वाढतं वजन खासकरून पोटावर वाढत असलेली चरबी आज एक मोठी समस्या बनली आहे. एक्सपर्ट नेहमीच याची वेगवेगळी कारणं सांगत असतात. त्यात लाइफस्टाईलमध्ये बदल आणि आहारात बदल ही दोन मुख्य कारणं सांगितली जातात. मग काय वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, जिमची मदत घेतात. बरेच एक्सपर्ट पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपायही सांगतात. असाच एक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा उपाय सांगितला आहे. त्यांनी त्यात सांगितलं की, एका खास आयुर्वेदिक चूर्ण वजन कमी करण्यास मदत करू शकतं. इतकंच नाही तर हे चूर्ण जर तुम्ही नियमितपणे १५ दिवस घ्याल तर लगेच फरक दिसून येईल. अशात चला जाणून घेऊ हे चूर्ण कसं तयार करायचं आणि यापासून कसा फायदा मिळेल.

कसं बनवाल चूर्ण?

चूर्ण तयार करण्यासाठी तुम्हाला ओवा, बडीशेप, जिरे आणि मेथीच्या दाण्यांची गरज लागेल. समान प्रमाणात चारही गोष्टी घ्या आणि हलक्या आसेवर भाजा. जे हे दाणे थंडे होतील तेव्हा मिक्सरमधून बारीक करा. तुमचं वजन कमी करणारं चूर्ण तयार आहे. हे तुम्ही एका एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करा.

रोज एक चमचा चूर्ण एक ग्लास गरम पाण्यात टाकून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनीदिला. हवं तर तुम्ही टेस्टसाठी यात थोडं काळं मीठ किंवा लिंबाचा रसही टाकू शकता.

कसा मिळेल फायदा?

ओवा

डॉक्टर सांगतात की, ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं, जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतं आणि फॅट बर्निंगमध्ये मदत करतं. तसेच यानं ब्लोटिंग आणि अॅसिडिटी सुद्धा दूर होते.

बडीशेप

बडीशेपमध्ये फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात, ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीर डिटॉक्स होतं. 

जिरे

जिऱ्यानं सुद्धा मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रोसेस अधिक वेगानं होते. याचा वजन कमी करण्यास फायदा मिळतो.

मेथी

मेथीमध्ये सॉल्यूबल फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. मेथीच्या दाण्यांनी खासकरून पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते.

काय काळजी घ्याल?

डॉक्टर म्हणाले की, प्रेग्नेंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी चूर्ण घेऊ नये. तसेच डायबिटीस किंवा हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर याचा वापर करावा. तर चूर्ण खूप जास्त घेऊ नये. एका दिवसात एक चमचा चूर्ण पुरेसं आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स