Join us

वेगवेगळे उपाय करूनही पोटावरची चरबी घटली नाही? आता ‘हा’ एक आयुर्वेदिक उपाय करा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:46 IST

Weight Loss Drink : चरबी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या आहेतच, सोबतच काही आयुर्वेदिक उपाय केले तर त्यांचाही फायदा मिळतो. असाच एक उपाय आयुर्वेदिक डॉक्टर इरफान यांनी सांगितला आहे.

Weight Loss Drink : लठ्ठपणा आणि पोटावर वाढलेली चरबी दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. खासकरून महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक दिसून येतो. वाढलेल्या चरबीमुळे त्या सतत चिंतेत असतात. अशात त्या वेगवेगळे उपायही करतात. जसे की, कमी जेवण, पायी चालणे, योगा, एक्सरसाईज. पण या गोष्टी करूनही चरबी काही कमी होत नाही. चरबी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेतच, सोबतच काही आयुर्वेदिक उपाय केले तर त्यांचाही फायदा मिळतो. असाच एक उपाय आयुर्वेदिक डॉक्टर इरफान यांनी सांगितला आहे. जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

डॉक्टर इरफान यांनी सांगितलं की, तुम्ही लठ्ठपणा किंवा चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर एक अशा काढा आहे ज्याद्वारे तुम्ही वाढलेली चरबी कमी करून वजन कमी करू शकता. 

वजन कमी करण्याचा आयुर्वेदिक उपाय

डॉक्टरांनी सांगितलं की, तुमचं पोट कितीही बाहेर आलेलं असेल तर या उपायानं पोटावरील चरबी गळून बाहेर पडले. अशात हा खास काढा बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज लागेल हे जाणून घेऊया.

काय साहित्य लागेल

दीड ग्लास पाणी

अर्धा चमचा किसलेलं आलं

अर्धा चमचा दालचीनी

अर्धा चमचा मेथी दाणे

अर्धा चमचा ओव्याची पूड

कसा तयार कराल काढा?

दीड ग्लास पाण्यात अर्धा चमचा किसलेलं आलं आणि इतर गोष्टी टाका. हे मिश्रण चांगल्याप्रकारे उकडू द्या. जेव्हा दीड ग्लास पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा ते गाळून घ्या. नंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून प्या.

कधी प्याल?

प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. अशात त्या गोष्टी त्या त्या वेळेला केल्या गेल्या तरच त्यांचा अधिक फायदा मिळतो. अशात लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्यासाठी तुम्ही हा काढा सकाळी आणि सायंकाळी पिऊ शकता. हा काढा जेवण करण्याच्या एक तास आधी किंवा नंतर प्यायला हवा. १५ दिवसात तुम्हाला या काढ्यानं फरक दिसून येईल.

डॉक्टरांनी सांगितलं की, बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करतात. पण त्यांना लगेच रिझल्ट हवा असतो. मात्र, वजन कमी करणं काही सोपं नसतं. तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला लगेच रिझल्ट देऊ शकतो.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स