Join us

जेवताना चुका करता म्हणून वजन वाढतं, तब्येत बिघडते! ३ 'S' लक्षात ठेवा- कित्येक आजार टळतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 09:25 IST

Avoid 3 Mistakes While Eating: ९० टक्के लोक जेवताना काही चुका हमखास करतात. त्याचाच परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसून येतो.(3 things responsible for weight gain and indigestion issue)

ठळक मुद्देजेवण करताना कोणते ३ नियम कटाक्षाने पाळायला हवे?

जेवण करणं ही आपल्या रोजच्या दिनक्रमातली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. पण बऱ्याचदा असं होतं की आपण इतर सगळ्या कामांसाठी वेळ काढतो. पण जेवणासाठी वेळ काढणं आपल्याला जमत नाही. कुठल्यातरी कामाची गडबड असते, कुठेतरी तातडीने जायचं असतं, त्यामुळे मग घाईघाईने आपण जेवण करतो. एकेक घास कसाबसा चावून पोटात ढकलतो. नेमकं इथेच चुकतं आणि त्यामुळेच मग कित्येक आजार डोकं वर काढतात. एवढंच नाही तर त्यामुळे वजनही वाढतं. हे सगळं टाळायचं असेल तर जेवण करताना ३ 'S' लक्षात ठेवायला हवे (avoid 3 mistakes while eating). ते नेमके कोणते ते पाहा..(3 things responsible for weight gain and indigestion issue)

 

जेवण करताना लक्षात ठेवायलाच पहिजेत अशा ३ गोष्टी..

जेवण करताना कोणते ३ नियम कटाक्षाने पाळायला हवे याची माहिती आहारतज्ज्ञांनी jinals89 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते नियम नेमके कोणते ते पाहूया..

नवरात्रीचे उपवास करताना शुगर वाढण्याची भीती वाटते? ९ पदार्थ खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये

१. Sit

आहारतज्ज्ञांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे एकाजागी शांतपणे बसून जेवा. अनेक जणांना काम करताना उभ्या उभ्या जेवण करण्याची सवय असते. धावतपळत ते कसंबसं जेवतात. यामुळे अन्न व्यवस्थित चावल्या न जाता ते तसंच पोटात जातं. यामुळे नीट पचन होत नाही. पचन नीट झालं नाही तर वजनही वाढत जातं.

 

२. Silent

दुसरी गोष्ट म्हणजे जेवण हे नेहमी शांतपणे केलं पाहिजे. पण हल्ली आपण जेवण करताना काय जेवतो आहोत ते बघतही नाही. कारण आपले डोळे मोबाईलच्या स्क्रिनवर खिळलेले असतात. ताटात काय आहे हे पाहण्यापेक्षा मोबाईलवर काय आहे, त्यावर आपली नजर असते.

कोलेस्टेरॉल नेहमीच वाढतं? जेवताना ५ गोष्टी लक्षात ठेवा, वाढलेलं कोलेस्टेरॉल होईल नॉर्मल

याचा परिणाम तुमच्या जेवणावर, पचनावर, मेटाबाॅलिझमवर होतोच. त्यामुळे जेवण नेहमी शांतपणे, प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत करा.

३. Slow

तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घास शांततेने चावा. अजिबात घाई करू नका. एकेक घास व्यवस्थित चावून जेवण केल्यास अन्नपचन, चयापचय चांगलं होतं. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्स