Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी खाऊनही भरभर वाढू लागतं वजन? पाहा शरीरातील कोणत्या बिघाडाने वाढतं वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:36 IST

Weight Loss : अनेक लोक तक्रार करतात की ते आहारात काळजी घेत असतानाही त्यांचं वजन अचानक वाढतं. हे फक्त जास्त खाण्यामुळे होत नाही, तर शरीरात चालू असलेल्या काही समस्यांचे संकेत असू शकतात.

Weight Loss : वाढतं वजन ही जगभरातील एक मोठी गंभीर समस्या आहे. केवळ वयस्करच नाही तर तरूणांमध्येही लठ्ठपणा अधिक बघायला मिळतोय. बरं असं नाही की, वजन कमी करण्यासाठी लोक प्रयत्न करत नाहीत. लोक डाएट करतात, व्यायाम करतात, योगा करतात किंवा अजूनही काही उपाय करतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कमी खातात. पण अनेक लोक तक्रार करतात की ते आहारात काळजी घेत असतानाही त्यांचं वजन अचानक वाढतं. हे फक्त जास्त खाण्यामुळे होत नाही, तर शरीरात चालू असलेल्या काही समस्यांचे संकेत असू शकतात. अशात जाणून घेऊया अचानक वजन वाढण्यामागील काही महत्त्वाची कारणे. 

हार्मोनल बदल

शरीरातील हार्मोन्स वजन नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खासकरून महिलांमध्ये थायरॉईड, PCOS किंवा मेनोपॉज दरम्यान हार्मोनल असंतुलन झाल्यास मेटाबॉलिझम कमी होतो आणि वजन वाढू लागते.

इन्सुलिन रेजिस्टन्स

इन्सुलिन शरीरातील साखर ऊर्जेमध्ये बदलण्याचं काम करतं. पण इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यास शरीरातील पेशी योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि अतिरिक्त साखर फॅट म्हणून साठू लागते. त्यामुळे वजन वाढतं आणि पुढे टाइप 2 डायबिटीसचा धोका वाढतो.

वाढतं वय

वय वाढल्यावर शरीरातील स्नायू कमी होतात आणि मेटाबॉलिक रेट मंदावतो. त्यामुळे शरीर कमी कॅलरी जाळते आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते, जरी आहार बदलला नसला तरी.

झोपेची कमतरता

झोप पूर्ण न झाल्यास शरीरात भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात आणि तृप्ती देणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे जास्त खाणे होते आणि ताणामुळे कोर्टिसोल वाढून पोटाभोवती चरबी साठते.

औषधांचा परिणाम

काही औषधे जसे की अँटी-डिप्रेसंट्स, स्टेरॉइड्स किंवा ब्लड प्रेशरची औषधे शरीरात वॉटर रिटेन्शन वाढवतात किंवा भूक वाढवतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudden weight gain despite eating less? Understand the underlying causes.

Web Summary : Unexpected weight gain can stem from hormonal imbalances, insulin resistance, aging, sleep deprivation, or medications. These factors disrupt metabolism, increase appetite, and promote fat storage, leading to weight gain even with a controlled diet.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स