आपल्या स्वयंपाक घरातच असे काही पदार्थ असतात जे आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच तब्येत उत्तम ठेवण्यासाठी मदत करत असतात. पण तरीही आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि वरवरच्या गोष्टींना प्राधान्य देतो. आता हेच बघा ना, सगळ्यांच्या स्वयंपाक घरात गूळ आणि तूप हे दोन पदार्थ असतात. पण खूपच कमी लोक ते नियमितपणे खातात. हे दोन पदार्थ जर एकत्र करून खाल्ले तर ते तुमच्या त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरते (amazing health benefits of eating ghee and jaggery together). त्यामुळे जर तुम्हाला गोड खावेसे वाटलेच तर गूळ आणि तूप एकत्र करून खा असं तज्ज्ञ सांगत आहेत.(why it is important to eat ghee and jaggery together?)
गूळ आणि तूप एकत्र करून खाण्याचे फायदे
गूळ आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने आरोग्याला नेमके कोणते लाभ होतात याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी vaidyajayashreed या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की दररोज एका वाटीमध्ये १ टीस्पून गूळ आणि १ टीस्पून तूप घ्या. दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि नंतर ते खा.. असं खाल्ल्याने त्वचेला कोणते फायदे होतात ते पाहूया..
मुलांचं वजन वाढण्यासाठी मदत करणारे ५ पदार्थ
१. त्वचेवरचे पिगमेंटेशन, पिंपल्स, ॲक्ने कमी होतात.
२. वाढत्या वयासोबत त्वचा सुरकुतते तसेच सैलसर पडल्यासारखी होते. हा त्रास कमी करण्यासाठीही गूळ- तूप एकत्र करून खाणे उपयुक्त ठरते. कारण त्यामुळे एजिंग प्रोसेस हळूवार होते.
३. गूळ- तूप एकत्र करून खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
गूळ आणि तूप एकत्र करून खाण्याचे अन्य फायदे
१. शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
तुम्हीही तूप खाताना 'ही' चूक करता का? तज्ज्ञ सांगतात त्यापेक्षा तूप न खाणंच योग्य
२. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते.
३. हाडे मजबूत होतात.
४. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठीही गूळ- तूप एकत्र करून खाणे फायद्याचे ठरते.