Ram Kapoor Weight Loss Journey : गेल्या काही महिन्यांआधी टीव्ही अभिनेते राम कपूर (Ram Kapoor) त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत होते. त्यावरून त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. आता सध्या ते त्यांनी घटवलेल्या वजनामुळे चर्चेत आहेत. 140 किलो वजन वाढलेले राम करून यांनी त्यांचं वजन 85 वर आणून ठेवलं आहे. आता हे किती अवघड काम असतं हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र वजन कमी (Weight Loss) करत असताना राम यांच्यासोबतच त्यांच्या परिवारानं काय काय त्याग केला आणि कशी मेहनत घेतली किंवा त्यांना कोणत्या मानसिक स्थितीतून जावं लागलं याबाबत त्यांची पत्नी अभिनेत्री गौतमी कपूर (Gautami Kapoor) यांनी मुलाखतीत माहिती दिली आहे. पूर्ण परिवारानं एकत्र वजन कमी करण्याचा काय प्रभाव पडला हा यातून खूप महत्वाचा संदेश समोर येतो.
अभिनेत्री गौतमी कपूर यांनी राम कपूर यांच्या वजन करण्याच्या प्रवासादरम्यान परिवाराला काय काय करावं लागलं याबाबत त्यांनी 'हॉटरफ्ला' सोबत बोलताना सांगितलं. गौतमी सांगतात की, "या वर्षात आम्ही अनेक वादांचा सामना केला. हा काळ खरंच खूप अवघड होता. हा काळ केवळ रामसाठीच नाही तर पूर्ण परिवारासाठी एका मोठ्या प्रवासासारखा होता. इतकंच काय आम्ही लोकांना भेटणंही बंद केलं, बाहेर जाणं बंद केलं आणि आम्हाला आवडतं ते बाहेरून जेवणं मागवणं सुद्धा बंद केलं.
गौतमी यांनी पुढे सांगितलं की, "रामने वजन कमी करण्याचं प्लानिंग सुरू करण्याआधी मुलगी सियानं 38 किलो वजन कमी केलं होतं. ज्यात 24 आणि 48 तास उपवास अशा गोष्टींचा समावेश होता. रामला वजन कमी करण्याची प्रेरणा सियाकडे बघूनच मिळाली होती. यादरम्यान आमच्या मुलानं देखील 10 किलो वजन कमी केलं होतं. ही सामूहिक प्रेरणाच रामनं सुद्धा स्वीकारली".
सायकियाट्रिस्ट डॉ. रोहित सपारे यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमसोबत बोलताना याबाबत सांगितलं की, "जेव्हा पूर्ण परिवार वजन कमी करण्याच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करतो, तेव्हा यानं सगळ्यांना मजबूत समर्थन आणि प्रेरणा मिळते. आव्हान इतकंच असतं की, हा बदल त्यांच्या भावानात्मक आरोग्यासोबत आणि आहारासोबत तडतोड करावी लागू नये. आपण जे खातो ते केवळ ईंधन नाही, याचा संबंध संस्कृती, भावना आणि संबंधासोबत जोडलेला असतो".
ते म्हणाले की, संतुलन खूप महत्वाचं असतं. परिवार मुद्दामहून खाण्या-पिण्याच्या नवीन पद्धती अवलंबू शकतात, ज्याद्वारे त्यांचं आरोग्यही चांगलं राहील आणि आनंद सुद्धा मिळेल. जसे की, सगळ्यांनी एकत्र सोबत जेवणं करणे, आवडत्या पदार्थांचे वेगळे पर्याय शोधणं किंवा काही खास दिवसांना काळजीपूर्वक आहाराची निवड करणे.
वजन कमी करण्याबाबतच्या अनेक स्टोरी नेहमीच समोर येत असतात. अमून एका व्यक्तीनं इतक्या दिवसात वजन कमी केलं, तितक्या दिवसात असं वजन कमी केलं. हे लोक सोशल मीडियावर फेमसही होतात. त्यांचं कौतुक केलं जातं. पण यात त्यांच्या परिवारांची कशी साथ असते किंवा त्यांना कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. कोणत्या स्थितींचा सामना करावा लागतो याबाबत फार कमी बोललं जातं. राम कपूर यांच्या वजन कमी करण्याच्या निमित्तानं ही बाब समोर आली आहे की, वजन कमी करण्यात परिवाराचा किती मोठा हात असतो किंवा असावा लागतो.