Plank for reduce belly fat : पोटावर वाढलेल्या चरबीमुळे आजकाल जास्तीत जास्त लोक वैतागलेले आहेत. खासकरून महिला त्यांच्या पोट, कंबर आणि मांड्यावरील चरबीमुळे चिंतेत असतात. आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठीण मानलं जातं. पोटावरील चरबी दूर व्हायला बराच वेळ लागतो. फिटनेस एक्सपर्ट पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज सांगतात. त्यातील सर्वात प्रभावी एक्सरसाइज प्लॅंक एक्सरसाईज मानला जातो. कारण प्लॅंक एक्सरसाईजनं फॅट बर्न करण्यास मदत मिळते.
प्लॅंक बेली फॅटमध्ये फायदेशीर
पोटावर वाढलेली चरबी सगळ्यात जास्त चिंताजनक असते. कारण यामुळे शरीर बेढब दिसतं आणि वेगवेगळ्या समस्याही होतात. अशात तुम्ही जर पोटावर वाढलेली चरबी कमी करून पोट फ्लॅट करण्यासाठी सोपा मार्ग शोधत असाल तर प्लॅंक यासाठी बेस्ट पर्याय आहे. कारण प्लॅंक केल्यानं पोटावरील चरबीच्या आजूबाजूच्या स्नायू सक्रिय होतात. जर शरीर पूर्णपणे फिट ठेवायचं असेल तर ही प्लॅंक एक्सरसाईज नियमितपणे करायला हवा. हा एक्सरसाइज कसा, याचा एक व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत. हा व्हिडीओ नवी सुरूवात करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
बेली फॅट बर्न करायची असेल किंवा शरीर फिट ठेवायचं असेल तर प्लॅंक एक्सरसाईजमध्ये संतुलन चांगलं असलं पाहिजे. फिटनेस एक्सपर्टनुसार, प्लॅंक पोजिशनमध्ये जेवढा जास्त वेळ तुम्ही थांबू शकाल, तेवढा जास्त फायदा होतो.
सुरूवातीला प्लॅंक करणारे लोक स्वत:ला ६० सेकंद या पोजिशनमध्ये ठेवू शकतात. जर तुम्ही या पोजिशनमध्ये एका मिनिट स्वत:ला व्यवस्थित ठेवू शकत असाल तर नंतर हा एक्सरसाईज ३ ते ४ वेळा करावा.
कोणताही एक्सरसाईज असो त्याचा प्रभाव ती एक्सरसाईज योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर केल्याने होतो. प्लॅंक करताना नेहमी पोजिशनकडे लक्ष द्या. जर तुम्ही पोजिशनमध्ये काही गडबड केली तर याचा प्रभावही कमी होईल.