Belly Fat : चरबीमुळे गोल-मटोल झालेलं आणि बाहेर आलेलं पोट कमी होऊन फ्लॅट दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण पोटावरील चरबी कमी करणं काही खायचं काम नाही. पोटावरील चरबी कमी करणं सगळ्यात अवघड आणि अंत बघणारं काम असतं. तासंतास जिममध्ये वर्कआउट केला तरच बॉडी टोन्ड आणि फिट राहते. जे लोक जिमला जात नाही, ते काही सोप्या गोष्टी फॉलो करून पोटावरील चरबी कमी करू शकतात.
एक्सपर्ट सांगतात की, पोट कमी करणं हे सांगितलं जातं तेवढंही अवघड काम नाही. काही चांगल्या सवयी लावल्या तर तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते. यासाठी लाइफस्टाईलमध्ये, डेली डाएटमध्ये काही बदल करावे लागतील.
तीन वेळा जास्त खाण्याऐवजी ५ वेळा थोडं थोडं खा
तीन वेळा पोटभर काही खाण्याऐवजी कमी प्रमाणात ४ ते ५ वेळा खा. यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल आणि बेली फॅट सहजपणे बर्न होईल. जर जिमला न जाता पोटावरील चरबी कमी करायची असेल तर योग्य डाएट फॉलो करणं फार गरजेचं आहे. प्रयत्न करा की, नाश्त्यामध्ये नट्स, ओट्स, फ्रूट्स असावेत. डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण वाढवा. रात्री उशीरा जेवल्यानं पोटावरील चरबी वाढू लागते. त्यामुळे झोपण्याच्या साधारण २ तास आधी जेवण करावे. जेवण केल्यावर काही वेळ वॉक नक्की करा. जंक फूड आणि गोड पदार्थ खाणं टाळा.
हायड्रेटेड रहा
शरीरात मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. पाण्यानं शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. दिवसभर ८ ते १० ग्लास पाणी पिणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यावं. यानं पोट साफ होण्यास आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. जेवणाआधी पाणी प्याल तर जास्त खाणं टाळता येतं. डिटॉक्स वॉटर घरीच तयार करू शकता. यासाठी पाण्यात लिंबाचा रस, काकडी, पदीना टाकून प्या. यानं पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळेल.
चांगली झोप घ्या
झोप कमी घेतल्यानं अनेकदा मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि शरीरात तणाव वाढणारे कार्टिसोल हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे रोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. झोपण्याच्या एक तास टीव्ही किंवा मोबाइल बघू नका.
फिजिकल अॅक्टिविटीज
जिमला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर रोज पायी चाला आणि हलकी एक्सरसाईज करा. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज साधारण ३० ते ४५ मिनिटं वॉक करा. पायऱ्या चढण्या-उतरण्याची सवय खूप फायदेशीर ठरेल. घरात झाडू मारणे, गार्डनिंग इत्यादीअॅक्टिविटीही फायदेशीर ठरतील.
हर्बल ड्रिंक आणि ग्रीन टी
ग्रीन टी आणि हर्बल ड्रिंक प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेसही फास्ट होते. दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिऊ शकता. ओव्याचं पाणी, दालचीनीचं पाणी आणि जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्यास फायदा अधिक मिळेल. दालचीनीचं पाणी रात्री झोपण्याआधी पिऊ शकता. लिंबू आणि मधाचं पाणी सकाळी पिऊ शकता.