Join us

गोलमटोल झालेलं पोट सपाट करणारा 'हा' खास काढा, पाहा कसा करायचा-कधी प्यायचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:13 IST

Weight Loss Drink : शरीरात वाढलेली चरबी कमी करायची असेल तर हा खास काढा फायदेशीर ठरू शकतो.

Weight Loss Drink : पोटावर वाढणारी चरबी अलिकडे मोठ्या समस्या बनली आहे. पोट मोठं झालं की ना मनासारखे कपडे घालता येत, ना हालचाल व्यवस्थित करता येत. इतकंच नाही तर शरीरात आजारही वाढतात. डॉक्टर लठ्ठपणाला डायबिटीस, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या आजारांचं मुख्य कारण मानतात. लठ्ठपणा कमी करण्याची ईच्छा अनेकांची असते. पण बिझी लाइफस्टाईलमुळे अनेकांना घरी एक्सरसाईज करण्यासाठी किंवा जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, शारीरिक हालचाल, योग्य लाइफस्टाईलसोबतच काही घरगुती उपाय केले तरी तुम्ही वजन कमी करू शकता.

डॉक्टर निशांत गुप्ता यांनी वजन कमी करण्याचा एक सोपा घरगुती सांगितला आहे. जो १५ दिवसात प्रभाव दाखवू शकतो, असा त्यांनी दावा केला आहे. यानं तुमच्या पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासोबत चेहराही खुलवण्यास मदत मिळेल.

काढा बनवण्याचं साहित्य

एक चमचा कापलेलं आलं

दोन तुकडे दालचीनी

२ वेलची

अर्धा चमचा बेडीशेप

अर्धा चमचा ओवा

अर्धा चमचा जिरे

कसा बनवाल काढा?

२ ग्लास पाण्यात या सगळ्या गोष्टी टाका, ५ मिनिटं हे पाणी चांगलं उकडू द्या, त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या, त्यानंतर यात अर्ध्या लिंबाचा रस टाका, हा खास काढा पिऊन वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

डॉक्टरांनुसार वजन कमी करणारं हे ड्रिंक सतत १५ दिवस प्यायचं आहे. याने पोटातील चरबी गळून बाहेर पडेल आणि लठ्ठपणा कमी होईल. लठ्ठपणा कमी झाल्यास चेहऱ्याचं सौंदर्यही खुलेल.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स