Join us

सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 15:00 IST

Weight Loss Tips: अंगावरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर हिवाळ्यात हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..(5 superfood in winter that helps to reduce weight)

ठळक मुद्देतुम्हाला फक्त तुमच्या आहारात थोडे बदल करावे लागतील आणि काही पदार्थ आवर्जून खावे लागतील. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा.

हिवाळा हा तब्येत कमावण्यासाठीचा सर्वोत्तम काळ. कारण या दिवसांत जे वातावरण असतं त्यामुळे आपण खातो ते सगळं छान पचतं, अन्न व्यवस्थित अंगी लागतं. त्यामुळे खवय्यांसाठी हिवाळा हा खऱ्या अर्थाने पर्वणी असतो. ज्यांचं वजन वाढत नाही, त्यांच्यासाठीही हा ऋतू उत्तम असतो. कारण या दिवसांत जेवण चांगलं जातं आणि वजन वाढतं. त्याचप्रमाणे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीही हिवाळा बेस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात थोडे बदल करावे लागतील आणि काही पदार्थ आवर्जून खावे लागतील (Weight Loss Tips). ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(5 superfood in winter that helps to reduce weight)

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ

 

१. सूप

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे जे लोक असतात, त्यांच्यासाठी सूप अतिशय उपयुक्त ठरतं. कारण सूपमुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अधिक कॅलरी पोटात जाण्यावर आपोआपच नियंत्रण येतं.

हलवा करण्यासाठी गाजर किसण्याचा कंटाळा येतो? घ्या रेसिपी, गाजर न किसता हलवा तयार... 

त्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असल्याने शरीर व्यवस्थित हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे या दिवसांत अधिकाधिक भाज्या घालून मिक्स व्हेज सूप पिण्यावर भर द्या.

 

२. हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात आणि खूप फ्रेश मिळतात. या भाज्या तुमच्या जेवणात अवश्य असू द्या. शक्य झाल्यास त्या कच्च्या खा.

ऐन हिवाळ्यात तुळस सुकू लागली? ५ सोप्या टिप्स, तुळस पुन्हा होईल हिरवीगार- डेरेदार 

त्यामध्ये गाजर, मुळा, बीट टाकता आलं तर अधिक उत्तम. या फायबरयुक्त पदार्थांमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

३. लिंबूवर्गीय फळं

हिवाळ्यात संत्री, मोसंबी अशी लिंबूवर्गीय फळं अधिक प्रमाणात येतात. ही फळं नियमितपणे तुमच्या शरीरात असू द्या. त्यातून मिळणारे ॲण्टीऑक्सिडंट्स फायदेशीर तर असतातच पण त्यांच्यातल्या पाण्याच्या पातळीमुळे शरीर व्यवस्थित हायड्र्रेटेड राहण्यास मदत होते.

 

४. मसाल्यांचा वापर

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे सतत काहीतरी गरम प्यावं वाटतं. अशावेळी दूध घालून केलेला चहा, कॉफी असं काही घेण्यापेक्षा आलं, दालचिनी, मिरेपूड, धणे, लवंग, तुळस, गवतीचहा असे सगळे मसाल्याचे पदार्थ टाकून केलेला काढा किंवा ब्लॅक टी प्या. या मसाल्याच्या पदार्थांमुळे पचनक्रिया तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.

 

५. सुकामेवा

हिवाळ्यात सुकामेवा घालून डिंकाचे लाडू केले जातात. दररोज हा एक लाडू अवश्य खा. यातून शरीराला याेग्य प्रमाणात मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात.

मुलांचे शाळेचे पांढरे सॉक्स खूपच मळकट होतात? २ पदार्थ वापरून धुवा- नव्यासारखे स्वच्छ होतील

त्यामुळे नाश्ता वगळून हा एक लाडू खाल्ला तरी बराच काळ भूक लागत नाही आणि अंगात एनर्जी टिकून राहते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहिवाळ्यातला आहारअन्नआरोग्यहेल्थ टिप्स