लग्नसराईचे दिवस अजून सुरूच आहेत. अशातच ज्यांच्या घरीच लग्न असते किंवा ज्यांच्या जवळच्या नातलगाचे, मित्रमैत्रिणीचे लग्न असते त्यांच्या मागची धामधूम तर विचारायलाच नको.. कारण या दिवसांत कामं खूप असतात. त्या कामांच्या गडबडीत कधी कधी जेवायलाही वेळ मिळत नाही. मग असंच काहीतरी अबरचबर खाल्लं जातं ज्यामुळे कित्येक अनावश्यक कॅलरी पोटात जातात. शिवाय या दिवसांत लाडू, पुरणपोळी, करंजी असे कित्येक गोडधोड पदार्थ केले जातात. पाहुणे मंडळींसोबत त्याचा यथेच्छ आस्वादही घेतला जातो. पण नंतर मात्र आपण जरा जास्तच खाल्लंय हे लक्षात येतं. कारण वाढलेलं वजन आपल्या अंगाखांद्यावर दिसायला लागलेलं असतं (simple and easy weight loss tips). अशीच गत तुमचीही झाली असेल तर हे वजन कमी करून पुन्हा आधीसारखं फिट कसं व्हायचं ते पाहूया...(4 simple tips for quick weight loss)
लग्नसराईमध्ये गोडधोड खाऊन वाढलेलं वजन कमी कसं करावं?
१. पहिला उपाय म्हणजे ओव्याचं पाणी. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये १ ते २ टीस्पून ओवा घालून पाणी चांगलं उकळवून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या. हे पाणी उपाशीपोटी प्यायल्यास मेटाबॉलिझम आणि पचन चांगलं होतं. वेटलॉस होण्यास मदत होते.
गॅस सिलेंडर मिळेल की नाही, टेन्शन आलंय? बघा ५ रेसिपी, गॅस पेटविण्याची गरजच नाही, गॅसची होईल बचत
२. जिरे आणि बडिशेप एकत्रितपणे तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. यासाठी २ कप पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा जिरे आणि १ चमचा बडिशेप घाला. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ते गाळून घ्या. हे पाणी उपाशीपोटी प्यायल्यास बॉडी नॅचरली डिटॉक्स होण्यास मदत होते.
३. एक वाटी पाण्यामध्ये १ टीस्पून मेथ्या रात्रभर भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथ्या बारीक चावून खा आणि मेथ्या भिजत घातलेलं पाणी पिऊन घ्या. यामुळेही वेटलॉस होण्यास तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..
४. सकाळी उठल्यानंतर एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि थोडा मध घालून प्या. यामुळेही शरीर डिटॉक्स होतं आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.
