Weight Loss Myths : वजन कमी करणं हा आजच्या काळात एक ट्रेंड झाला आहे. जिम, डाएटिंग, हेल्दी रेसिपीज, सुपरफूड्स या गोष्टी अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. पण या धावपळीत वजन कमी करण्याबाबत अनेक चुकीच्या समजुती पसरतात आणि त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या अशा गोष्टींपासून सावध राहणे गरजेचे आहे. अशाच वजन करण्याबाबतच्या 5 सामान्य मिथकांबाबत जाणून घेऊया.
कार्ब्स पूर्णपणे सोडले पाहिजेत
सत्य
हे वजन कमी करण्याबाबतचं सर्वात धोकादायक मिथक आहे. कारण कार्बोहायड्रेट हे शरीराचे मुख्य ऊर्जा स्त्रोत आहेत. कार्ब्स पूर्णपणे बंद केल्यास शरीर थकलेलं, कमकुवत आणि चिडचिडं वाटू शकतं.
महत्वाचे मुद्दे
कार्ब्स कमी करणे गरजेचे नाही, योग्य प्रकारचे कार्ब्स खाणे महत्त्वाचे आहे ब्राउन राईस, ओट्स, डाळी, भाज्या यातील कॉम्प्लेक्स कार्ब्स फायबरयुक्त असून शरीराला जास्त वेळ ऊर्जा देतात. मैदा, साखर, व्हाइट ब्रेड असे रिफाइन्ड कार्ब्स कमी खाणे आवश्यक आहे.
उशिरा रात्री जेवल्याने वजन वाढतं
सत्य
वजन वाढणं किंवा कमी होणं हे दिवसभरात घेतलेल्या आणि खर्च झालेल्या एकूण कॅलरीवर अवलंबून असतं, जेवणाच्या वेळेवर नाही. उशिरा रात्री खाल्ले म्हणजे आपोआप वजन वाढत नाही. मात्र रात्री जास्त तेलकट, तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ल्यास पचन बिघडू शकतं, झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा वजनावर प्रभाव पडतो. रात्री भूक लागल्यास हलका, प्रोटीनयुक्त आहार घेणं फायदेशीर ठरेल.
फक्त व्यायाम केल्याने वजन कमी होतं
सत्य
व्यायाम हा वजन कमी करण्याच्या प्रवासाचा फक्त एक भाग आहे. डाएट हा सर्वात मोठा घटक आहे. जर तुम्ही खर्च करता त्यापेक्षा जास्त कॅलरी घेत असाल, तर कितीही व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही. बरेचजण म्हणतात तसा 80% डाएट + 20% व्यायाम हा फॉर्म्युला बराच प्रमाणात योग्य ठरतो. व्यायामामुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि मसल्स तयार होतात, पण डाएट कंट्रोलशिवाय पूर्ण परिणाम मिळत नाही.
लो-फॅट किंवा फॅट-फ्री प्रोडक्ट्स वजन कमी करण्यासाठी उत्तम असतात
सत्य
हे अनेकदा कंपन्यांचं मार्केटिंग तंत्र असतं. फॅट काढून टाकल्यावर चव टिकवण्यासाठी त्या प्रॉडक्टमध्ये जास्त साखर, मीठ आणि कृत्रिम फ्लेवर घातले जातात. त्यामुळे ते लो-फॅट असले तरी कॅलरी जास्त असू शकतात आणि वजन वाढवू शकतात. नट्स, अॅवोकाडो, तूप यातील नैसर्गिक हेल्दी फॅट्स मर्यादित प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी आवश्यक आहे.