Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > स्वयंपाकघरातील ४ मसाले करतील जादूई फॅटलॉस, चरबी गायब होताच सगळे विचारतील सिक्रेट काय...

स्वयंपाकघरातील ४ मसाले करतील जादूई फॅटलॉस, चरबी गायब होताच सगळे विचारतील सिक्रेट काय...

4 Indian Spices That Melt Belly, Waist & Hip : Indian spices to burn belly fat : spices for weight loss in hips and waist : best Indian spices for fat loss : कंबर, पोट, मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी मसाल्यांच्या डब्यांतील कोणते खडे मसाले आहेत असरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 19:25 IST2025-07-28T19:25:01+5:302025-07-28T19:25:27+5:30

4 Indian Spices That Melt Belly, Waist & Hip : Indian spices to burn belly fat : spices for weight loss in hips and waist : best Indian spices for fat loss : कंबर, पोट, मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी मसाल्यांच्या डब्यांतील कोणते खडे मसाले आहेत असरदार...

4 Indian Spices That Melt Belly, Waist & Hip Indian spices to burn belly fat spices for weight loss in hips and waist best Indian spices for fat loss | स्वयंपाकघरातील ४ मसाले करतील जादूई फॅटलॉस, चरबी गायब होताच सगळे विचारतील सिक्रेट काय...

स्वयंपाकघरातील ४ मसाले करतील जादूई फॅटलॉस, चरबी गायब होताच सगळे विचारतील सिक्रेट काय...

सध्याच्या काळात आपल्या सगळ्यांनाच बैठ्या जीवनशैलीची अगदी सवय लागली आहे. ऑफिस, घर कुठेही असलो तरी देखील आपण दिवसातील बरेच तास एकाच ठिकाणी तासंतास (4 Indian Spices That Melt Belly, Waist & Hip) बसून घालवतो. दिवसातील काही तास सतत एकाच ठिकाणी (Indian spices to burn belly fat) बसून राहिल्याने पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी वाढण्याची समस्या सतावते. विशेषतः बैठ्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या खाण्याच्या (spices for weight loss in hips and waist) सवयींमुळे आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो. पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी वाढल्याने आपल्या शरीराचा आकार बिघडून बेढब दिसू लागतो(best Indian spices for fat loss).

शरीराचा बिघडलेला आकार सुधारण्यासाठी आपण जिममध्ये जातो, जिममध्ये काहीवेळा तासंतास एक्सरसाइज व डाएट करून देखील ही शरीरावरील अतिरिक्त चरबी काही केल्या हटत नाहीच. डॉक्टर, मंजिरी यांनी पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी डाएट व एक्सरसाइज सोबतच एक खास घरगुती उपाय देखील सांगितला आहे. पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या डब्यांतील काही मसाले फायदेशीर ठरू शकतात. हे मसाले फक्त चयापचय क्रियेचा वेगच वाढवत नाहीत, तर नैसर्गिकरित्या चरबी जाळण्याची प्रक्रिया देखील अधिक वेगवान करतात. स्वयंपाक घरातील मसाले आपल्याकडे कायम असतात त्यामुळे आपण दररोज हे उपाय न चुकता करु शकतो. मसाल्यांच्या डब्यांतील कोणत्या मसाल्यांनी पोटाची चरबी, कंबर आणि मांड्यांवर साठलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते ते पाहूयात. 

मसाल्यांच्या डब्यांतील 'हे' मसाले आहेत खास... 

१. दालचिनी :- मेटाबॉलिज्म वाढवणारे नैसर्गिक बूस्टर :- दालचिनी फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.  यात थर्मोजेनिक गुणधर्म असतात, जे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्ह  होते. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते आणि इन्सुलिनची पातळी संतुलित करते, ज्यामुळे चरबी कमी होऊ लागते. दालचिनी पावडर आपण चहा, ओट्स किंवा डाळीतही घालून खाऊ शकता.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

 

२. काळीमिरी :- चरबीच्या पेशींवर थेट परिणामकारक :- काळीमिरीमध्ये पायपरिन (piperine) नावाचा एक घटक असतो जो चरबीच्या पेशी (fat cells) तयार होण्यापासून थांबवतो. त्याचबरोबर ते पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिज्मला अ‍ॅक्टिव्ह करते. यामुळे शरीरात साठलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते.आपण काळीमिरी सॅलॅड, ताक किंवा लिंबू पाण्यात मिसळून पिऊ शकता. दररोज फक्त एक चिमूटभर काळीमिरी तुमची कंबर आणि पोटाची चरबी बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात. 

३. ओवा :- पचनासोबत चरबीही कमी होते :- ओवा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे जो पोटाची चरबी लवकर कमी करू शकतो. ओवा नियमित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर काढते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजवलेला ओवा गाळून प्यायल्याने पोट हलके होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. चरबी वितळवण्यासाठी हा अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे.

४. बडीशेप :- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :- बडीशेप बहुतेकदा आपण माऊथ फ्रेशनर म्हणून खातात, पण ती चरबी कमी करण्यातही असरदार  आहे. बडीशेप शरीरातील पाण्याचे अतिरिक्त प्रमाण (water retention) कमी करते आणि पचनसंस्था मजबूत बनवते.दररोज एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून गाळून घ्या आणि सकाळी-संध्याकाळी प्या. याची चवही चांगली असते आणि पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते.

स्वयंपाकघरातील ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात घालून प्या, कंबरेवर-पोटावर वाढलेले चरबीचे टायर सहज होतील गायब...

वेटलॉससाठी हे मसाले कसे फायदेशीर आहेत ? 

या मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि थर्मोजेनिक (Thermogenic) गुणधर्म असतात, जे शरीराचे मेटाबॉलिज्मचा वेग (Metabolism) वाढवतात. मेटाबॉलिज्म वाढताच, शरीर अधिक ऊर्जा वापरते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया (Fat Burning Process) वेगवान होते. याच कारणामुळे हे मसाले अतिशय फायदेशीर ठरतात. या मसाल्यांचा दररोजच्या आहारात वापर केल्यास पोट आणि कमरेची चरबी कमी होऊ लागते आणि शरीर स्लिम दिसू लागते.

हे मसाले योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाणे खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरू शकतो. दालचिनी आणि ओवा सकाळी रिकाम्या पोटी घेणे सर्वात फायदेशीर ठरते, तर काळीमिरी आणि बडीशेप दिवसातून कधीही जेवणात मिसळून खाऊ शकता. नेहमी ताजे आणि चांगल्या प्रतीचे मसाले वापरा. आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यांतच फरक दिसू लागेल, पण त्यासाठी तुम्ही संतुलित आहार आणि थोडीफार एक्सरसाइज करणे देखील  आवश्यक असते.

Web Title: 4 Indian Spices That Melt Belly, Waist & Hip Indian spices to burn belly fat spices for weight loss in hips and waist best Indian spices for fat loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.