Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर

वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर

Weight Loss Yoga : वजन कमी करणं काही खायचं काम नाही. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज जर ४० ते ४५ मिनिटं योगा केला तर वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:03 IST2025-01-23T10:21:17+5:302025-01-23T16:03:53+5:30

Weight Loss Yoga : वजन कमी करणं काही खायचं काम नाही. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज जर ४० ते ४५ मिनिटं योगा केला तर वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

4 effective yoga poses for weight loss know the benefits | वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर

वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर

Weight Loss Yoga : योगाभ्यास भारतात फार प्राचीन काळापासून केला जातो. योगामुळे होणारे फायदे पाहून आता जगभरात याचा प्रसार झाला आहे. रोज योगाभ्यास करून तुम्ही फीट तर राहताच, सोबतच आरोग्यही चांगलं राहतं. पाठदुखी, कंबरदुखी, डोळ्यांची दृष्टी कमी होणे, डोकेदुखी, तणाव अशा समस्या दूर करण्यासाठी योगाची मदत घेतली जाते. सोबतच वजन कमी करण्यासाठीही योगा केला जातो.

आजकाल वजन वाढण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. त्यात वजन कमी करणं काही खायचं काम नाही. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज जर ४० ते ४५ मिनिटं योगा केला तर वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. योगा करून हेल्दी पद्धतीनं वजन कमी करता येतं आणि शरीर आतून मजबूत बनतं. यामुळे शरीर लवचिक, मसल्स मजबूत होतात व पोश्चरही चांगलं होतं.

American Osteopathic Association च्या एका रिपोर्टनुसार, योगा तुम्हाला फिजिकली आणि मेंटली निरोगी ठेवतो. अशात वजन कमी करण्यासाठी कोणते योगासन जास्त फेमस आहेत हे जाणून घेऊ.

सूर्य नमस्कार

सूर्य नमस्कार हा एक पावरफुल योगा  आहे. यात १२ पोजेसचा एक समूह आहे. रोज जर सूर्य नमस्कार केला तर वजन कमी होतं, हृदय निरोगी राहतं, मसल्स आणि डायजेस्टिव सिस्टीम मजबूत होतं. त्यासोबतच तणावही कमी होतो. सूर्य नमस्कार १० ते १५ मिनिटं करणं पुरेसं आहे.

नौकासन

नौकासन करून तुम्हाला टोन्ड फिगर मिळण्यास मदत मिळते. याला इंग्रजीमध्ये बोट पोज असंही म्हणतात. कारण हे आसन करताना शरीर नावेच्या आकाराचं दिसतं. या आसनानं पोटाच्या मांसपेशी, पाय, कंबर आणि मांड्या मजबूत होतात. 

कोब्रा पोज

याला भुजंगासन असंही म्हटलं जातं. खास बाब म्हणजे हे आसन करणं फार सोपं आहे. तसेच याचे फायदेही अनेक आहेत. भुजंगासन करून पोटावरील चरबी कमी होते आणि वजन कमी होतं. मानेचं दुखणं, कंबरदुखी, खांदेदुखी अशा समस्याही या आसनानं दूर होतात.

धनुरासन

धनुरासन हे एक शक्तीशाली आसन आहे. जे तुम्ही रोज करायला हवं. कारण हे आसन पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत करतं.  खासकरून पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. मसल्स मजबूत करण्यासाठी सुद्धा हे आसन बेस्ट मानलं जातं.

Web Title: 4 effective yoga poses for weight loss know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.