Join us

किचनमधील 'या' ३ गोष्टींनी वेगानं कमी होईल वजन, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:16 IST

Weight Loss Home Remedies : आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सवालिया यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं आहे, ज्यांच्या मदतीनं तुम्ही वजन कमी करू शकता. 

Weight Loss Home Remedies : वाढत्या वजनामुळे आजकाल जगभरातील लोक चिंतेत आहेत. कारण एकदा जर वजन वाढलं तर ते कमी करणं फार अवघड काम असतं. सोबतच अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकले आहेत. लाइफस्टाईलमध्ये बदल, डाएट आणि एक्सरसाईजसोबतच इच्छाशक्ती असेल तर वजन कमी करता येतं. सोबतच असेही काही आयुर्वेदिक उपाय आहेत, ज्यांच्या मदतीनं वजन कमी करता येतं. 

वजन वाढल्यानं शरीर तर बेढब दिसतंच, सोबतच हार्ट डिजीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक, टाइप २ डायबिटीस, काही प्रकारचे कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, स्लीप एप्निया, ऑस्टियोआर्थराइटिस, संधिवात आणि फॅटी लिव्हर अशा गंभीर समस्याही होतात.

अशात किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींच्या मदतीनं तुम्ही वजन कमी करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सवालिया यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं आहे, ज्यांच्या मदतीनं तुम्ही वजन कमी करू शकता.

वजन कमी करतं मध

मध हे एक बेस्ट फॅट बर्नर मानलं जातं. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे मेटाबॉलिज्म बूस्ट करततात आणि फॅट बर्न करण्याची प्रोसेस वेगानं करतात. अशात मधाचा रोजच्या आहारात समावेश करावा. रोज एक चमचा मध सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी हळद

भारतीय किचनमध्ये हळदीचा वापर रोज वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. हळदीमधील औषधी गुणांमुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. हळदीच्या मदतीनं तुमचं वजन कमी होऊ शकतं. डॉ. दीक्षा यांनी सांगितलं की, हळद गरम आणि डिटॉक्सिफाइंग असते. यानं शरीर डिटॉक्स होऊन इम्यूनिटी मजबूत होते, अतिरिक्त कफ कमी होतो आणि डायबिटीस मॅनेज करण्यास मदत मिळते. अर्धा चमचा हळद तुम्ही मधासोबत किंवा आवळ्यासोबत खाऊ शकता. हळदीचं पाणीही फायदेशीर ठरतं.

वजन कमी करण्यासाठी आले

बरेच लोक सकाळी आल्याचा चहा पितात. आल्यामधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीराला अनेक फायदे देतात. तेच, यातील फेनोलिक तत्व लठ्ठपणा कमी करतात. आल्यामुळे भूक आणि पचन तंत्र सुधारतं. तसेच कफ संतुलित होतो. आले हृदयासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी उपाशीपोटी आल्याचा एक तुकडा चावून खा आणि वरून एक ग्लास कोमट पाणी प्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स