वजन वाढीच्या समस्येने हल्ली खूप जणं त्रस्त आहेत. आहे ते वजन नियंत्रित कसं ठेवायचं किंवा वाढलेलं वजन कसं कमी करायचं हा अनेकांपुढचा प्रश्न आहे. याशिवाय वारंवार ॲसिडीटी होणं, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता असे त्रासही अनेकांना नेहमीच होतात. कोलेस्टेरॉल वाढलेलं असणं, बीपी, शुगर हे त्रासही कमी वयातच मागे लागलेले आहेत. अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर काही नियम पाळले तर नक्कीच त्यांचे यापैकी कित्येक त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते (3 important rules in morning for fitness). त्यासाठी काय करायचं याविषयी डॉक्टरांनी शेअर केलेली माहिती...(Weight Loss Tips)
स्वत:ला नेहमीच फिट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ३ गोष्टी
तब्येत सांभाळण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे, याविषयीची माहिती डॉक्टरांनी baat_to_sahi_hain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
मोगऱ्यावर शिंपडा 'हा' घरगुती स्प्रे, पान दिसणार नाही इतक्या येतील कळ्या- रोज काढा परडीभर फुलं
१. यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर १ ग्लास कोमट किंवा रुम टेम्परेचरचं पाणी प्या. यामुळे पचनाचे कित्येक त्रास कमी होतील. शरीर हायड्रेटेड राहील. ज्या लोकांना ॲसिटीडीचा त्रास असतो त्यांनी कोमट किंवा गरम पाणी न पिता थंड पाणी प्यावे.
२. पाणी प्यायल्यानंतर एक नॅचरल बाॅडी डिटॉक्स ड्रिंक प्यावे. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात ओवा, जिरे, धणे, बडिशेप, हळद आणि दालचिनी पावडर घालावी. सकाळी उठल्यानंतर हे पाणी उकळून घ्यावे अणि कोमट झाल्यावर प्यावे. यामुळे ब्लोटिंग, शरीरावर आलेली सूज कमी होते आणि वेटलॉस होण्यास मदत होते.
केस झाडूसारखे कोरडे, रुक्ष झाले? १ सोपा उपाय- ८ दिवसांत केस होतील रेशमासारखे मऊ- सुळसुळीत
३. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नाश्ता. वेटलॉससाठी किंवा अन्य कोणत्यााही कारणांसाठी तुमचा नाश्ता टाळू नका. नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर जास्तीतजास्त प्रमाणात घ्यावे. यामुळे भूक नियंत्रणात राहाते. वारंवार शुगर स्पाईक, क्रेव्हिंग होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास आपोआपच मदत होते.
Web Summary : Worried about weight gain and acidity? Doctors recommend starting your day with a glass of lukewarm water, a detox drink made of spices, and a protein-rich breakfast. This helps improve digestion, reduce bloating, control cravings, and manage weight effectively.
Web Summary : वजन बढ़ने और एसिडिटी से परेशान हैं? डॉक्टर सुबह की शुरुआत गुनगुने पानी, मसालों से बने डिटॉक्स ड्रिंक और प्रोटीन युक्त नाश्ते से करने की सलाह देते हैं। इससे पाचन में सुधार होता है, सूजन कम होती है, क्रेविंग नियंत्रित होती है और वजन प्रभावी ढंग से प्रबंधित होता है।