दिवाळीत (Diwali 2025) आपण सुंदर, प्रेझेंटेबल, देखणं दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. काही सोप्या आणि हेल्दी टिप्स फॉलो करून तुम्ही दिवाळीआधी २- ३ किलो वजन कमी करू शकता. झपाट्यानं वजन कमी करणं आणि कमी वेळेत वजन कमी करणं हे फारसं योग्य मानलं जात नाही पण तरीसुद्धा रोजच्या आहारात आणि सवयींमध्ये मोजके बदल करून तुम्ही आपोआप थोडंफार वजन घटवू शकता. वजन कमी करणं हे मोठं आव्हान न वाटता सोपं होईल जेव्हा तुम्ही सोपे बदल करून स्वत:ला हेल्दी, फिट ठेवण्याचा प्रयत्न कराल. (How To Lose Weight Before Diwali)
१) जसं की मिठाई, शितपेयं, तळलेले पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. यातून शरीराला अनावश्यक कॅलरीज आणि फॅट्स मिळतात.
२) प्रत्येक जेवणात प्रोटीन जसं की डाळी, कडधान्य एड करा. ज्यामुळे पोट लवकर भरतं आणि भूकही नियंत्रात राहते.
३) दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यानं जेवण अति प्रमाणात खाणं टाळता येतं.
रव्याचे मऊसूत लाडू करण्याच्या १० टिप्स, १०० % परफेक्ट होतील लाडू, जिभेवर ठेवताच विरघळतील
४) सकाळी उपाशीपोटी अर्धा तास का होईना व्यायाम करा. कोमट पाण्यात लिंबू, मध किंवा जिरं, ओवा भिजवून याचं पाणी प्या.
५) रात्री जास्तीत जास्त ८ च्या आधी जेवा. जेवणात हेवी पदार्थ न खाता मुगाच्या डाळीची खिचडी, सॅलेड असे पदार्थ खा.
६) रोज ७ ते ८ तासांची झोप पूर्ण होतेय याची काळजी घ्या. अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात आणि वजन कमी करणं कठीण होतं.
हातावर काढा सोप्या सर्कल मेहंदी डिजाइन्स; १० सुंदर नक्षी-हात दिसतील देखणे
७) वजन कमी करण्यासाठी जेवण वगळू नका. जेवण सोडल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.
८) दिवाळीच्या तयारीचा ताण घेऊ नका. ताण-तणावामुळे कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन वाढतो ज्यामुळे वजन वाढतं. ध्यान किंवा श्वासांचे व्यायाम करा.
९) आहारात मीठाचं प्रमाण कमी करा. ज्यामुळे शरीरात पाणी साचते आणि वजन वाढल्यासारखं वाटतं.
१०) गोड खाण्याची इच्छा झाली तर फळं खा. कोणतेही प्रोसेस्ड, साखरयुक्त पदार्थ खाऊ नका.