lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Best Breakfast For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर खाली दिलेले १० पदार्थ आलटून पालटून तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घ्या.. हा नाश्ता वेटलॉससाठी (weight loss) तर मदत करतोच, पण शुगर कंट्रोलमध्ये (sugar control) ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 02:53 PM2022-05-11T14:53:39+5:302022-05-11T14:54:48+5:30

Best Breakfast For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर खाली दिलेले १० पदार्थ आलटून पालटून तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घ्या.. हा नाश्ता वेटलॉससाठी (weight loss) तर मदत करतोच, पण शुगर कंट्रोलमध्ये (sugar control) ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे.

10 breakfast items that can control sugar and helps in weight loss. | Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Highlightsइन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवून शुगर कंट्रोल आणि वेटलॉस या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही ब्रेकफास्ट पदार्थ.

दररोजचा नाश्ता काय करावा, हा खरं तर प्रत्येक घरातल्या महिलेसमोरचा खूप मोठा प्रश्न. त्यात जर कुणी वेटलॉस करत असेल किंवा घरातल्या कुणाला शुगर असेल तर अशा सगळ्यांनाच चालेल असा आणि त्यातही पुन्हा चवदार नाश्ता बनवणं हा तर खरंच एक अवघड टास्क असतो.. म्हणूनच तर हे बघा नाश्त्याचे काही सुपर हेल्दी पर्याय (super healthy breakfast items).. अशा प्रकारचा नाश्ता असेल तर घरातले सगळेच खूश होऊन जातील..(food items that can control insulin level)

 

वेटलॉस आणि शुगर कंट्रोल या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी कशा प्रकाराचा नाश्ता करावा, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्याdietitian_manpreet या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की वेटलॉस कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची मोठी भुमिका असते. याशिवाय इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित असणं शुगर असणाऱ्यांसाठीही खूप गरजेचं आहे. म्हणूनच इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवून शुगर कंट्रोल आणि वेटलॉस या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही ब्रेकफास्ट पदार्थ.

 

१. हरबऱ्याच्या डाळीचं पनीर टाकून केलेलं धीरडं आणि पुदिना- कोथिंबीर चटणी
२. पाठीच्या म्हणजेच हिरव्या मुगाच्या डाळीचा डोसा आणि नारळाची चटणी
३. भरपूर भाज्या आणि पनीर घालून केलेले पोहे
४. पनीर स्टफ ज्वारीचा पराठा आणि घरी केलेलं एखादं लोणचं
५. ओट्स आणि ढोकळा
६. बेसन आणि गव्हाचं पीठ घालून केलेला पराठा आणि घरचं लोणचं


७. ओट्स आणि मुगडाळ घालून केलेली इडली आणि त्यावर कढीपत्ता टाकून घातलेली फोडणी
८. ओट्स, २ अक्रोड आणि सब्जा घालून दह्यामध्ये केलेलं पुडींग
९. हरबरा स्प्राऊट, पनीर टीक्की आणि पुदिना चटणी
१०. प्रोटीन किक Smoothie- यासाठी १ मुठभर रोस्टेड मखाना, दोन टीस्पून सातुचं पीठ, २०० मिली नारळाचं पाणी किंवा साधं दूध, अर्ध केळ, चिमूटभर वेलची पावडर आणि एक खजूर एवढं साहित्य लागेल. हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि त्याची छान स्मुथी करा. प्रोटीन रिच असणारी ही स्मुथी अतिशय पौष्टिक आहे.  

 

Web Title: 10 breakfast items that can control sugar and helps in weight loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.